शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

प्रचंड दबावाखाली उतरणार मुंबई, कोलकाता

By admin | Updated: October 12, 2014 02:26 IST

इंग्लिश प्रीमिअर लीग, चॅम्पियन्स लीग, ला लीग, आदी स्पर्धासाठी आत्तार्पयत रात्र रात्र भर जागणा:या भारतीय तरुणांना आयएसएलच्या माध्यमातून हक्काची लीग मिळाली आहे.

कोलकाता : परदेशात सुरू असलेल्या इंग्लिश प्रीमिअर लीग, चॅम्पियन्स लीग, ला लीग, आदी स्पर्धासाठी आत्तार्पयत रात्र रात्र भर जागणा:या भारतीय तरुणांना आयएसएलच्या माध्यमातून हक्काची लीग मिळाली आहे. त्यामुळे या लीगकडून कोटय़वधी फुटबॉल प्रेमींच्या अपेक्षाही वाढल्या असल्याने प्रत्येक संघावर त्यांचे लक्ष्य असणार आहे. हेच दडपण घेऊन रविवारी अॅटलेटिको डे कोलकाता आणि मुंबई सिटी एफसी संघ येथील सॉल्ट लेक स्टेडियमवर उतरणार आहेत. त्यांच्यावर दबाव असेल ते या लीगच्या दणक्यात सुरुवातीचे आणि जेतेपदासाठी प्रत्येक संघांमध्ये चुरस कशी रंगेल हे दाखविण्याचे. 
फुटबॉलवेडय़ा कोलकाताच्या घरच्या मैदानावरच ही लढत होणा असल्याने प्रेक्षकांचाही प्रचंड प्रतिसाद त्यांना मिळेल हे नक्की. अॅटलेटिकोला प्रेक्षकांकडून असलेल्या महत्वकांशेची जाण असल्याने ते पुर्ण दमाने या सामन्यात उतरतील, परंतु ते मुंबई संघाला कमकुवत समजण्याची चुक करणार नाही. 
स्पेनमधील आपल्या यशस्वी सराव शिबीरानंतर अॅटोनिओ हबास यांचा अॅटलेटिको संघ 4-1-4-1  किंवा 4-2-3-1 अशा रणनितीने मैदानात उतरतील हे निश्चित. अॅटलेटिकोसंघाला बोर्जा फर्नाडिस, कॅवीन लोबो, ऑफेत्सें नाटो हे आंतरराष्ट्रीय स्टार मिडफिल्डरची धुरा संभाळतील. त्यांना लुईस गार्सिआ, जाकुब पोडनी आणि संजू प्रधान, फिकरू टेरेफा, अर्नाल लिबर्ट, मोहम्मद रफी आणि बलजित शाहनी यांची चांगली साथ मिळेल.  जोसमी याच्या उपस्थितीमुळे अॅटलेटिकोचा डिफेन्स मजबूत झाला आहे. त्याच्या मदतीला अर्नाब मोंडल, लिऑन आणि मोनाको यांची चांगली साथ मिळेल. 
एकीकडे अॅटलेटिको संघ मजबूत दिसत असला तर दुसरीकडे मुंबई संघ मैदानाबाहेर अडचणीत सापडला आहे. फ्रेंच फुटबॉलर निकेलास अनेल्का याच्यावर तीन सामन्यांची बंदी घातल्याने मुंबईला पहिल्या तीन लढतीत त्याच्याशिवाय उतरावे लागणार आहे. त्यात भर म्हणून फ्रेडी जुंगबर्ग दुखातग्रस्त झाला आहे. पण, प्रशिक्षक पीटर रिड यांनी पहिल्या लढतीत फ्रेडी काहीकाळ खेळेल असा विश्वास व्यक्त केला आहे. बचावाची जबाबदारी कर्णधार सय्यद रहिम नबी, मॅन्युएल फ्रेड्रिक, दीपक मोंडल आणि पवेल सीमोव्स यांच्यावर असेल. जोहान लेटझेल्टर, पीटर कोस्टा आणि जॅन स्टोहांजल हे सेंटर मिडफिल्डवर असतील. लालरिंदीका राल्टे हा डावीकडून त्यांना मदत करेल, तर उजवीकडून नाडाँग भुतिआ आणि सिंघम सुभाष सिंह यांच्याकडून मदतीची अपेक्षा आहे. 
मैत्रीपूर्ण लढतीत डिएगो नदाया याने हॅट्ट्रिक मारून मुंबईला विजय मिळवून दिला होता. या लढतीत आक्रमणाची धुरा त्याच्यावरच असेल. (वृत्तसंस्था)
 
अॅटलेटिको डे कोलकाता : लुईस गार्सिआ, अपौला एडीमा एडेल बेटे, बासिलीओ सांको अगुडो, सुभाशिष रॉय चौधरी, अर्नाब मोंडल, बिस्वजीत सहा, डेंजिल फ्रान्को, जोस मिग्युएल गोंझालेज रे, किंगशुक देबनाथ, नल्लप्पन मोहनराज, सिल्वेन मोन्सोरियू, बोर्जा फर्नाडिस, केवीन लोबो, क्लायमॅक्स लॉवरेन्स, जाकुब पोडनी, जोफ्रे माटय़ू गोंझालेज, लेस्टर फर्नाडिस, मोहम्मद मामुनुल इस्लाम मामुन, ऑफेन्स्ते नाटो, राकेश मासिह, संजु प्रधान, अर्नाल लीबर्ट कोंडे काबरे, बलजीत सहानी, फिक्रु टेरेफा लेमेसा, मोहम्मद रफी, मोहम्मद रफिक.
 
मुंबई सिटी एफसी : फ्रेड्रिक जुंगबर्ग, अॅण्ड्रे माटोस डिआस परेरा, इशांत देबनाथ, सुब्रता पॉल, दीपक मंडल, लीआस पोलासिस, जोहान लेटझेल्टर, मॅन्युएल फ्रेड्रिक, पॅवेल सिमोव्स, पीटर कोस्टा, राजु गायकवाड, सय्यद रहिम नबी, आसिफ कोट्टायील, फ्रान्सीस्को जेवीएर फर्नाडेस लुक्यूए, जान स्टोहांजल,लालरिन फेला, लालरिंडीका राल्टे, राम मलिक, टिएगो मॅन्युएल फर्नाडिस रिबेरिओ, अभिषेक यादव, डिएगो फर्नाडो नडाया, नाडोंग भुतिआ, निकोलास अनेल्का, रोहित मिङर, सिंघम सुभाष सिंह, सुशिल कुमार सिंह