शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई इंडियन्स विजयी ट्रॅकवर

By admin | Updated: April 25, 2016 23:32 IST

सुरवातीला केलेल्या दमदार फलंदाजीनंतर गोलंदाजांनी केलेल्या शिस्तबद्ध कामगीरीच्या जोरावर मुंबईने पंजाबचा २५ धावांनी पराभव केला.

ऑनलाइन लोकमत
मोहाली, दि. २५ - सुरवातीला केलेल्या दमदार फलंदाजीनंतर गोलंदाजांनी केलेल्या शिस्तबद्ध कामगीरीच्या जोरावर मुंबईने पंजाबचा २५ धावांनी पराभव केला. मुंबईने दिलेल्या १९० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबला २० षटकात ७ गड्यांच्या मोबदल्यात १६४ धावापर्यंत मजल मारता आली. मोक्याच्या क्षणी मुंबईकर गोलंदाजांनी आक्रमक गोलंदाजी करत मार्श- मॅक्सवेलला रोखले.
 
रायडू, पार्थिव, मिशेल मॅक्लेनघन, बुमराह आणि टीम साऊदी मुंबईच्या विजयाचे शिल्पकार ठरले. बुमराहने ४ षटकात २६ धावांच्या मोबदल्यात ३ गडी बाद केले तर टीम साऊदी आणि मिशेल मॅक्लेनघनने प्रत्येकी २ फलंदाजाला बाद केले. पंजाबकडून मार्शने ४५ तर मॅक्सवेलने ५६ धावांची खेळी केली. कर्णाधार मिलरने ३० धावांचे योगदान दिले. पंजाबच्या इतर फलंदाज लौकीकास खेळी करण्यात अपयशी ठरले. 
 
त्यापुर्वी, पार्थिव पटेल आणि अंबाती रायडू यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर मुंबईने पंजाब समोर १९० धावांचे आव्हान ठेवले होते. मुंबईने निर्धारित २० षटकात ६ गड्यांच्या मोबदल्यात धावा १८९ केल्या. पार्थिव पटेलने धडाकेबाज फलंदाजी करताना ५८ चेंडूत १० चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ८१ धावा केल्या होत्या. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करताना पंजाब संघाने दमदार सुरवात केली. पहिल्याच षटकात संदीप शर्माने कर्णधार रोहित शर्माला बाद केले.
 
शर्मा बाद झाल्यानंतर दबावात आलेल्या मुंबई संघाने संथ सुरवात केली. मैदानावर जम बसल्यानंतर रायडू-पटेलने पंजाबची गोलंदाजी तोडून काढली. रायडू - पटेलने दुसऱ्या विकेटसाठी १३७ धावांची भागीदारी केली, १४.१ षटकात प्रतिषटक ९.६७च्या सरासरीने त्यांनी धावा चोपल्या. अबाती रायडूने धडाकेबाज फलंदाजी करताना ३७ चेंडूत ४ चौकार आणि ४ षटकाराच्या मदतीने ६७ धावांचे योगदान दिले. रायडू बाद झाल्यानंतर बटलरने १३ चेंडूत झटपट २४ धावांचे योगदान दिले. त्याने १ षटकार आणि ३ चौकार लगावले.
 
पार्थिव पटेल आणि बटलर यांच्या दरम्यान ३ विकेटसाठी ३.२ षटकात ३७ धावांची भागीदारी झाली. पटेल बाद झाल्यानंतर पालार्डला आपल्या लौकीकास साजेशी खेळी करता आली नाही. मोहित शर्माने शेवटच्या २ चेंडूवर २ फलंदाज बाद केले. पोलार्डने १० आणि हार्दिक पांड्याने ४ धावांचे योगदान दिले. रायडूला ९व्या षटकात जिवदान मिळाले तर पटेलला ५व्या षटकात जिवदान मिळाले. मिळेलेल्या जिवदानाचा दोघानी पुरेपुर फायदा घेतला. पंजाबकडून मोहित शर्माने ३ फलंदाजाला बाद केले तर संदिप शर्मो, अक्षर पटेल, जॉनसन ने प्रत्येकी एका फलंदाजाला बाद केले.