शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
2
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
3
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
4
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
5
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
6
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
7
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
8
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
9
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
10
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
11
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
12
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
13
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
14
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
15
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
16
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
17
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
18
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
19
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
20
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा

आंतर विद्यापीठ अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत मुंबईकरांची छाप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2020 04:15 IST

११० मीटर अडथळा आणि २०० मीटर शर्यतीत जबरदस्त वर्चस्व राखताना आंतर विद्यापीठ अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत मुंबई विद्यापीठासाठी सुवर्ण कामगिरी केली.

मुंबई : अ‍ॅल्डेन नोरोन्हा आणि कीर्ती भोईटे यांनी अनुक्रमे ११० मीटर अडथळा आणि २०० मीटर शर्यतीत जबरदस्त वर्चस्व राखताना आंतर विद्यापीठ अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत मुंबई विद्यापीठासाठी सुवर्ण कामगिरी केली. त्याचप्रमाणे गोळाफेकीमध्ये पूर्वा रावराणे हिने मुंबई विद्यापीठासाठी रौप्य पदकाची कमाई केली.कर्नाटक येथील मूदुबिदिरे येथील स्वराज्य मैदानावर झालेल्या ८०व्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत मुंबई विद्यापीठाच्या खेळाडूंनी आपली छाप पाडली. या स्पर्धेत चमकलेल्या मुंबईकर खेळाडूंनी यावेळी भुवनेश्वर येथे २२ फेब्रुवारी ते ३ मार्च दरम्यान होणाऱ्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघातही स्थान मिळवले.पुरुष ११० मीटर अडथळा शर्यतीत मुंबईच्या अ‍ॅल्डेनने जबरदस्त वर्चस्व राखताना १४.२६ सेकंदाची वेळ नोंदवली. त्याच्या धडाक्यापुढे मंगलोर विद्यापीठाच्या देबार्जुन मुर्मु (१४.४०) आणि महात्मा गांधी विद्यापीठाच्या रोनाल्ड बाबु (१४.५५) यांना अनुक्रमे रौप्य व कांस्य पदकावर समाधान मानावे लागले. महिलांच्या २०० मीटर शर्यतीमध्ये कीर्तीने मुंबईसाठी सुवर्ण धाव घेतली. तिने सुरुवातीपासून राखलेले वर्चस्व अखेरपर्यंत कायम राखताना २४.७१६ सेकंदाची वेळ देत सुवर्ण पदकावर नाव कोरले. पालमुरु विद्यापीठाच्या हरिका देवी (२४.८४०) आणि कालिकत विद्यापीठच्या श्रुतीराज यू. व्ही. (२४.९९८) यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्य जिंकले.खेलो इंडिया गेम्स खेळाडू :अ‍ॅल्डेन नोरोन्हा, पूर्वा रावराणे, कीर्ती भोईटे, अक्षय शेट्टी (२०० मी.), कृष्णा, निधी सिंग (४०० मी. अडथळा) मिश्र रिले संघ : कीर्ती भोईटे, निधी सिंग, अतुल साळुंखे, अरनॉल्ड - अक्षय शेट्टी.>गोळाफेकीत चंदेरी यशमहिलांच्या गोळाफेक स्पर्धेत मुंबईच्या पूर्वा रावराणेला सुवर्ण पदकापासून वंचित रहावे लागले. तिने १४.४५ मीटरची फेक करत मुंबई विद्यापीठाचे रौप्य पदक निश्चित केले. मेरठच्या चरणसिंग विद्यापीठच्या किरण बालियनने (१५.६९) एकहाती वर्चस्व राखताना सुवर्ण पटकावले. बरेलीच्या रोहिलखंड विद्यापीठाच्या श्रृष्टी विगने (१४.३२) कांस्य जिंकले. याआधी झालेल्या प्राथमिक फेरीत पूर्वा १३.८७ मीटरच्या फेकीसह तिसºया स्थानी राहिली होती. मात्र अंतिम फेरीत तिने आपल्या कामगिरीत सुधारणा केली.