शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई इंडियन्सचा हैदराबादवर 4 गडी राखून विजय

By admin | Updated: April 13, 2017 00:21 IST

मुंबई मुंबई इंडियन्ससने सनरायझर्स हैदराबादचा चार विकेटने पराभव केला. हैदराबादने दिलेले 159 धावांचे आव्हान मुंबईने आठ चेंडू राखून आणि सहा विकेटच्या मोबदल्यात पार केले

ऑनलाइन लोकमत मुंबई, दि. 12 - मुंबई इंडियन्सने सनरायझर्स हैदराबादचा चार गडी राखून पराभव केला. हैदराबादने दिलेले 159 धावांचे आव्हान मुंबईने आठ चेंडू राखून आणि सहा विकेटच्या मोबदल्यात पार केले. मुंबईकडून राणाने पुन्हा एकदा मॅच विनिंग खेळी करताना 45 धावांचे योगदान दिले. पार्थिव पटेल 39 आणि कृणाल पांड्याने 37 धावांची महत्वपूर्ण खेळी करताना मोलाचे योगदान दिले.

मुंबईचा तिसऱ्या सामन्यातील दुसरा विजय आहे, तर हैदराबादचा तिसऱ्या सामन्यातील पहिला पराभव आहे. हैदराबादकडून भुवनेश्वर कुमारने चार षटकात 21 धावांच्या मोबदल्यात 3 बळी मिळवले. प्रथम फलंदाजी करताना हैदराबाद संघाने निर्धारीत 20 षटकात 8 गड्यांच्या मोबदल्यात 158 धावा केल्या होत्या. आजच्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करणाऱ्या मुंबईने गोलंदाज हरभजन सिंग, जसप्रीत बुमरा आणि लसिथ मलिंगा यांनी केलेल्या भेदक माऱ्याच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादला 8 बाद 158 धावांवरच रोखले. तत्पूर्वी हैदराबाद संघाकडून फलंदाज डेव्हिड वॉर्नर (49) आणि शिखर धवन (48) यांनी संघाला 48 धावांची सलामी दिली. मात्र हरभजन सिंगने वॉर्नरची विकेट काढल्यानंतर हैदराबादचा डाव गडगडला. दीपक हूडा (9) युवराज सिंग (5) आणि बेन कटिंगने (20) यांनी निराशा केल्याने हैदराबादला निर्धारीत 20 षटकात 8 बाद 158 धावांपर्यंतच मजल मारता आली.