शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

एकदिवसीय सामन्यात या देशांनी बनवल्या आहेत सर्वात जास्त धावा

By admin | Updated: August 21, 2016 19:40 IST

१९७१ पासून कोणत्या संघाने किती धावा केल्या हे पाहिल्यास अनेक मनोरंजनक माहिती आणि आकडेवारी समोर येते. सर्वाधिक धावा केलेल्या टॉप १० टीम्सचा हा थोडक्यात आढावा.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. २१ : क्रिकेटच्या इतिहासातील पहिला एकदिवसीय सामना १९७१ मध्ये ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात खेळवला गेला होता. सुरुवातीच्या काळात एकदिवसीय क्रिकेट सामने ६०-६० ओव्हर चे खेळवले जायचे. काही कालावधीनंतर षटकांचीसंख्या ५० ओव्हर करण्यात आली. कालानुरूप या क्रीडाप्रकारात अनेक बदल कारण्यात आले आहेत.एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा (१८,४२६) आणि सर्वाधिक शतकांचा (४९) विक्रम आपल्या लाडक्या तेंडल्या म्हणजेच सचिन तेंडुलकर याच्या नावावर आहे. या सर्वात अगदी सुरवातीपासून म्हणजेच १९७१ पासून कोणत्या संघाने किती धावा केल्या हे पाहिल्यास अनेक मनोरंजनक माहिती आणि आकडेवारी समोर येते. सर्वाधिक धावा केलेल्या टॉप १० टीम्सचा हा थोडक्यात आढावा.१०. बांगलादेश सर्वाधिक धावांचा विचार केल्यास १० क्रमांकावर बांगलादेश चा क्रमांक लागतो. बांगलादेश पहिला एकदिवसीय सामना १९८६ खेळाला होता. आजपर्यंत  बांगलादेश ने एकूण ३१२ एकदिवसीय सामने खेळले असून ९८ सामन्यांत विजय तर २१० सामन्यांत पराजयाचा सामना करावा लागला आहे. बांग्लादेशच्या नावावर ६०,३९१ धावा आहेत. २४. २९ च्या ऍव्हरेज ने बांग्लादेशने या धावा बनवलेल्या आहेत.९. झिम्बाब्वेझिम्बाब्वेचा क्रमांक सर्वाधिक धावा केलेल्या संघांमध्ये ९ वा असून सुमारे ९६,०८२ धावा या संघाच्या नावावर आहेत. १९८३ साली झिम्बाब्वेने आपला  पहिला एकदिवसीय सामना खेळला होता. या संघाने आजपर्यंत एकूण ४७४ एकदिवसीय सामने खेळले असून त्यातील १२२ सामने जिकंले आहेत तर ३३७ सामने हरले आहेत. ८. दक्षिण आफ्रिकादक्षिण आफ्रिका या आकडेवारीत आठव्या स्थानावर येते. अपर्थाइडच्या कारणासाठी दक्षिण आफ्रिका संघाला १९७० ते १९९१ या कालावधीत क्रिकेटमधून बंदी घालण्यात आली होती. परंतु १९९१ पासून या संघाने ५५८ एकदिवसीय सामने खेळले आहेत. या सर्व सामन्यांत मिळून दक्षिण आफ्रिकने केलेल्या धावांची संख्या १,२६,१२६ इतकी असून ऍव्हरेज ३५.२५ आहे. हे सर्वोत्तम ऍव्हरेज आहे. या धावा ५.०४ च्या रनरेट ने केल्या असून हा इतर संघाच्या तुलनेत सर्वोत्तम रनरेट आहे.७. इंग्लंडइंग्लंडने पहिला एकदिवसीय सामना १९७१ मध्ये खेळला होता. तेंव्हापासून आजपर्यंत या संघाने ६६९ सामन्यांत २९.९९ च्या ऍव्हरेज ने एकूण १,४२,९६६ धावा केल्या आहेत. यात ३२२ सामने जिकंले आहेत तर ३१६ सामन्यात प्रभावाला सामोरे जावे लागले आहे.६. न्युझीलँड१९७१ साली न्युझीलँडने पहिला एकदिवसीय सामना खेळाला होता. १९७१ पासून आत्तापर्यंत न्युझीलँडने १,४५,१२९ धावांसह एकूण ७०३ एकदिवसीय सामने खेळले आहेत. यात ३११ सामने जिकंले आहेत तर ३४८ सामने हारले आहेत.५. वेस्ट इंडिजवेस्ट इंडिज संघाने १९७३ मध्ये आपला पहिलावहिला एकदिवसीय सामना खेळला होता. या देशाने सुरुवातीच्या काळात सुमारे दशकभर या खेळावरअधिराज्य केले  आहे. वेस्ट इंडिजला या खेळात जगज्जेता होण्याचा मान दोन (१९७५ आणि १९७९) वेळा मिळालेला आहे. या संघाने एकूण ७४१ एकदिवसीय सामने खेळले असून त्यात सुमारे १,५३,५१३ धावा केल्या आहेत. या दरम्यान ३७६ सामन्यांत विजय तर ३३३ सामन्यांत हार पत्करावी लागली आहे.४. श्रीलंकाश्रीलंकाने पहिला एकदिवसीय सामना १९७५ मध्ये खेळला होता. आजपर्यंत श्रीलंकाने एकूण ७७२ एकदिवसीय सामने खेळले असून ३६४ सामन्यांत विजय तर ३६९ सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला आहे. श्रीलंकेच्या नावावर २९.७१ च्या ऍव्हरेज ने १,६३,५०९ धावा आहेत.३. पाकिस्तानपाकिस्तानने १९७३ साली आपला पहिला एकदिवसीय खेळाला होता. आजपर्यंत पाकिस्तानने एकूण ८५७ एकदिवसीय सामने खेळले असून ४५२ सामन्यांत विजय तर ३७९ सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला आहे. पाकिस्तानच्या नावावर १,८४,४८२ धावा आहेत. ३०.१० च्या ऍव्हरेज ने पाकिस्तान ने या धावा बनवलेल्या आहेत.२. ऑस्ट्रेलियासर्वाधिक धावांचा विचार केल्यास ऑस्ट्रेलिया दुसऱ्या स्थानावर येते. ऑस्ट्रेलियाने आपला पहिला एकदिवसीय सामना १९७१ मध्ये इंग्लंडविरुद्ध खेळाला होता. तेव्हापासून आत्तापर्यंत या संघाने एकूण ८७७ एकदिवसीय सामने खेळले असून ४५२ सामन्यांत विजय तर ३७९ सामन्यांत हार पत्करावी लागली आहे. ऑस्ट्रेलियाने ३०.०९ च्या ऍव्हरेज ने सुमारे १,९५,८८३ इतक्या धावा केल्या आहेत.१. भारतएकदिवसीय सामन्यात सर्वाधिक धावा करण्याऱ्या देशांच्या यादीत भारत अग्रस्थानी आहे. भारताने आपला पहिला एकदिवसीय सामना १९७३ मध्ये खेळला होता. भारताने १९७३ पासून आजपर्यंत एकूण ८९९ एकदिवसीय सामने खेळले असून त्यात ३२.७९ च्या ऍव्हरेज ने १,९६,८१४ धावा काढल्या आहेत. खेळलेल्या ८९९ सामन्यांपैकी भारताला ३९९ सामन्यांत पराभवाला सामोरे जावेलागले आहे तर ४५४ सामन्यांत विजय संपादन केला आहे.