शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

कोहली, रहाणेवर अधिक लक्ष!

By admin | Updated: March 16, 2017 01:18 IST

खेळपट्टीचा कुणाला किती उपयोग होतो, हे मला अद्याप कळलेले नाही. कसोटी क्रिकेटमध्ये खेळपट्टीचे सुरुवातीपासूनचे स्वरूप कसे असेल

- हर्षा भोगले लिहितो..खेळपट्टीचा कुणाला किती उपयोग होतो, हे मला अद्याप कळलेले नाही. कसोटी क्रिकेटमध्ये खेळपट्टीचे सुरुवातीपासूनचे स्वरूप कसे असेल, हे जाणून घेण्याची कला फार थोड्या लोकांना अवगत झाली आहे.आॅस्ट्रेलियन संघ खेळपट्टीबाबत दिवसागणिक डावपेच ठरवित जाईल, असे दिसते. असे झाले तरी भारताने काळजी करण्याचे कारण नाही. कारण जेव्हा तुम्ही नकारात्मकता वापरता तेव्हा लहान लहान तथ्याच्या मागे जात असता. एखादा संघ वाईटाच्या मागे लागला असेल तर त्याची परिणती देखील तितकीच वाईट होते, हे सत्य आहे.मालिकेत १-१ अशी बरोबरी असली तरी बंगळुरूच्या विजयासोबत भारत आॅस्ट्रेलियावर वरचढ ठरला. बॉर्डर-गावस्कर चषकावर नाव कोरण्यासाठी आॅस्ट्रेलियाला एक विजय हवा असेल तर भारताला दोन विजयांची गरज आहे. भारतीय संघ तरीही निर्धास्त आहे. तिसऱ्या कसोटीत दोन किंवा त्याहून अधिक फिरकी गोलंदाज खेळवायचे की नाही हा एकच प्रश्न संघ व्यवस्थापनापुढे आहे. रांचीची खेळपट्टी भरपूर वळण घेऊ शकते, असा भारताला विश्वास असेल तर संघात सहाव्या स्थानावर खेळणारा अतिरिक्त फलंदाज संघात घेणे चांगली कल्पना असेल. दुसरीकडे फार काळ क्षेत्ररक्षण करावे लागू शकते, असे वाटत असेल तर अतिरिक्त फिरकी गोलंदाज खेळविणे सोयीचे होणार आहे. दहा खेळाडू निवडणे सोपे होते तेव्हा संघात चांगली भावना आहे, याची खात्री पटते.भारताने मालिकेला सुरुवात करण्याआधी विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे चांगले कसोटी फलंदाज म्हणून गाजत होते. कोहली चारही डावांत अद्यापही स्थिरावला नाही. पण रहाणेने मात्र बंगळुरूत विजयी भागीदारी करीत फॉर्म गवसल्याची झलक दिली आहे. तरीही या दोन फलंदाजांच्या खेळावर माझी नजर असेल. आश्विनने बंगळुरूत सहा गडी बाद करीत स्वत:मध्ये उत्साह भरला. नंबर वन गोलंदाज फॉर्ममध्ये असेल तर प्रतिस्पर्धी संघाला चित करण्यात मजा येते. मागच्या सामन्यात अन्य गोलंदाजही ‘क्लिक’ झाल, ही कर्णधारासाठी जमेची बाजू ठरावी. जेव्हा गोलंदाज चांगला मारा करतो, तेव्हा चेंडू वारंवार मिळावा, असा त्याचा प्रयत्न असतो. पण भारताच्या चारही गोलंदाजांना संधी मिळेल, याबद्दल मी साशंक आहे. भारत तिसऱ्या कसोटीत फेव्हरिट मानला जात आहे; पण आॅस्ट्रेलियाने सुरुवातीला खेळावर नियंत्रण मिळविल्यास त्यांना देखील विजयाची संधी राहील.