डसेलडोर्क : भारताच्या मोनिका बत्रा आणि मौमा दास या जोडीला विश्व टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत महिला दुहेरीत नेदरलंड व पोलंडच्या जोडीकडून पुढे चाल मिळाल्यामुळे उपांत्यपूर्व फेरीत पोहोचून इतिहास रचण्याची संधी मिळाली. दुसरीकडे पुरुष एकेरीत भारताच्या शरथ कमलने उक्रेनच्या कोऊ लेईला नमवत अंतिम ३२ मध्ये आपली जागा निश्चित केली. भारतीय महिला जोडी मोनिका बत्रा व मौमा दास यांना उपउपांत्यपूर्व फेरीत नेदरलंडची लि जिये आणि पोलंडच्या लि कुईयान या जोडीकडून पुढे चाल मिळाल्यामुळे त्यांचा उपांत्यपूर्व फेरीत सहज प्रवेश झाला. कुईयान आजारी पडल्यामुळे तिला बुधवारी रात्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मौमा व मोनिकाची पुढची लढत चीनची डिंग निंग आणि लियू शिवेन यांच्याविरुद्ध होणार आहे. पुरुषांच्या गटात ४३ व्या क्रमांकावर असलेल्या भारताच्या शरथ कमलने २४ व्या क्रमांकावर असलेल्या उक्रेनच्या कोऊ लेईला ११-३, ११-९, १४-१२, ११-३ गुणांनी नमविले. (वृत्तसंस्था)
मोनिका बत्रा, मौमा दासने रचला इतिहास
By admin | Updated: June 2, 2017 00:51 IST