शहरं
Join us  
Trending Stories
1
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
2
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
3
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
4
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
5
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
6
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
7
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
8
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
9
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
10
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
11
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
12
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
13
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  
14
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
15
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले
16
चीनकडून कोण चोरतंय रेअर अर्थ मेटल? का उडालीये ड्रॅगनची झोप, काय आहे प्रकरण?
17
आरोग्याशी नको खेळ! मीठापासून साखरेपर्यंत... 'या' पांढऱ्या गोष्टी तुमच्यासाठी ठरू शकतात विष
18
"पटोलेंनी उल्लेख केलेली व्यक्ती काँग्रेसचीच"; हनी ट्रॅपची कुठलीही तक्रार नसल्याचे CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
19
"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान
20
"विधानसभेतील राडा हा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रकार’’, बाळासाहेब थोरात यांची टीका 

मोदीजी..तुम्हाला कोणता खेळ आवडतो?

By admin | Updated: September 5, 2015 00:36 IST

गोव्याच्या सोनियाचा पंतप्रधानांना ‘स्पेशल’ सवाल

गोव्याच्या सोनियाचा पंतप्रधानांना ‘स्पेशल’ सवाल
सचिन कोरडे : मोदीजी, तुम्हाला कोणता खेळ आवडतो? असा निरागस आणि भाबडा सवाल विचारताच पंतप्रधानही क्षणभर गोंधळले. त्यावर आम्ही राजकारणात कोणते खेळ खेळतो हे सगळ्यांनाच माहित आहे, असा हास्यविनोद मोदींनी केला. सोनियाच्या या ‘स्पेशल’ प्रश्नावर उपस्थितांनाही धक्का बसला. त्यानंतर मोदींनी सोनियाला थेट प्रश्न केला. अमेरिकेतून तू काय आणलेस? त्यावर सोनियाने पदक आणल्याचे सांगितले. मोदी-सोनिया यांच्यातील प्रश्न उत्तरांचा सिलसिला काही वेळ सुरु राहिला. आई घरातील काम सांगत नाही काय, यावर सोनियाने आपणास चांगले खेळाडू बनायचे आहे अणि म्हणून घरातील काम करत नाही, असे उत्तर दिले. या उत्तराव मोदींना हास्य आवरता आले नाही.
शिक्षक दिनाचे औचित्य साधून नवी दिल्ली येथे झालेल्या एका विशेष समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या विद्यार्थ्यांमध्ये गोव्याच्या सोनिया पाटील हिला सुद्धा मान मिळाला. नुकत्याच अमेरिकेत झालेल्या विशेष खेळाडूंच्या ऑलिम्पिक स्पर्धेत सोनियाने 200 मीटर शर्यतीत सुवर्ण तर 400 मीटर शर्यतीत रौप्य पटकाविले होते. सोनियाची ही कामगिरी देशासाठी अभिमानास्पद ठरली. जन्मापासून कमी बुध्यांक असलेल्या बेळगाव जवळील खानापूर येथील 12 वर्षीय सोनिया पाटील हिला 200 5मध्ये दिशा चॅरीटेबल ट्रस्टमध्ये दाखल करण्यात आले. गेल्या दहा वर्षांपासून ती येथेचे विविध कौशल्य शिकत आहे. तिला खेळाची आवड असल्याने शिक्षकांनी सोनियाला धावण्याच्या शर्यतीत भाग घेण्यास सांगितले. त्यात तिने स्वत:ला सिद्ध केले. ती उत्कृष्ट धावपटू असून तिने आतापर्यंत राज्य, राष्ट्रीय पातळीवरही छाप सोडली आहे.
दरम्यान, पतप्रधान नरेंद्र मोदी यांना सोनियाला प्रश्न विचारण्याची संधी मिळाली. हा आमच्या शाळेसाठी मोठा बहुमान असल्याची प्रतिक्रीया शिक्षकांनी व्यक्त केली. तर सोनियाला मिळालेल्या या संधीचे तिच्या आईने मनभरुन कौतुक केले आहे. निश्चितच, ती खूप प्रेरित झाली असेल, असे तिची आई लक्ष्मी पाटील म्हणाली.