शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
3
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
4
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
5
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
6
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
7
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
8
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
9
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
10
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
11
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
12
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
13
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
14
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
15
६८२ बेकायदा बांधकामांचे पाणी, वीज तोडणार! ठाणे पालिका गुन्हेही दाखल करणार, बजावणार नोटिसा
16
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
17
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
18
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
19
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
20
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव

मोदींकडून श्रीनिवासन ‘लक्ष्य’

By admin | Updated: June 30, 2015 02:14 IST

आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदी यांनी राजकारण्यानंतर आता क्रिकेटमधील कट्टर विरोधी आयसीसी चेअरमन एन. श्रीनिवासन यांना लक्ष्य केले.

नवी दिल्ली : आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदी यांनी राजकारण्यानंतर आता क्रिकेटमधील कट्टर विरोधी आयसीसी चेअरमन एन. श्रीनिवासन यांना लक्ष्य केले. एका बिल्डरकडून लाच घेण्याचा आरोप असलेल्या स्वत:च्या चेन्नई सुपरकिंग्स संघातील तीन खेळाडूंना श्रीनिवासन पाठिशी घालत असल्याचा मोदींनी खुलासा केला.बनावट दस्तावेजांवर ब्रिटेनमध्ये पोहोचल्यामुळे मोदी वादात अडकले. याप्रकरणी त्यांनी अंमलबजावणी संचलनालयावर(ईडी) तोंडसुख घेतले. मनीलॉन्ड्रिंगच्या आरोपाचे पुरावे सादर करण्याचे आव्हान त्यांनी ईडीला दिले. लंडनमध्ये वास्तव्यास असलेल्या मोदींनी भारतात परतण्याची शक्यता धुडकावून लावताना मला सरकारच्या आश्वासनांवर नव्हे तर स्वत:वर विश्वास असल्याचे स्पष्ट करीत माझ्या जीवाला धोका नसल्याची खात्री पटल्यानंतरच भारतात परत येईल, असे ठासून सांगितले. लंडन येथे एका भारतीय वृत्त वाहिनीशी बोलताना ते पुढे म्हणाले, ‘आयसीसी चेअरमन श्रीनिवासन काय करीत आहेत? चेन्नई सुपरकिंग्सच्या तीन खेळाडूंचा बचाव! माझ्यासह सर्वच भारतीय या प्रश्नाचे उत्तर जाणून घेऊ इच्छितात. श्रीनिवासन हे विश्वासू व्यक्ती असेल तर क्रिकेटला परमेश्वरच वाचवू शकेल.’’एका बिल्डरने तीन खेळाडूंना लाच दिल्याची तक्रार ई मेलद्वारे मोदी यांनी जून २०१३ मध्ये पाठविल्याच्या वृत्तास आयसीसीने काल दुजोरा दिला. त्यावेळी श्रीनिवास हे चेन्नईचे मालक होते. आता त्यांनी मालकी हक्क सोडला. हा मेल भ्रष्टाचारविरोधी पथकाला पाठविण्यात आला. त्यांनी त्यावर कारवाई केली शिवाय बीसीसीआयलादेखील माहिती दिली. (वृत्तसंस्था)