शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मिश्र दुहेरीत सानिया-डोडिग जोडीला उपविजेतेपद

By admin | Updated: January 30, 2017 03:31 IST

सातवे ग्रँडस्लॅम जिंकण्याचे स्वप्न उराशी घेऊन मैदानात उतरलेल्या भारतीय टेनिसस्टार सानिया मिर्झाच्या पदरी निराशा पडली आहे.

सातवे ग्रँडस्लॅम जिंकण्याचे स्वप्न उराशी घेऊन मैदानात उतरलेल्या भारतीय टेनिसस्टार सानिया मिर्झाच्या पदरी निराशा पडली आहे. सानिया आणि तिचा क्रोएशियन सहकारी इवान डोडिग या द्वितीय मानांकित जोडीला आॅस्ट्रेलियन ओपनच्या मिश्र दुहेरीच्या अंतिम सामन्यात पराभवाचा धक्का बसला. अमेरिकेच्या एबिगेल स्पियर्स व कोलंबियाच्या युआन सबेस्टियन कबाल या बिगरमानांकित जोडीने त्यांचा सरळ सेटमध्ये ६-२, ६-४ असा पराभव केला.सामन्याच्या सुरुवातीपासूनच स्पियर्स आणि कबाल जोडीने आक्रमक खेळ केला आणि सानिया-डोडिग जोडीला लय मिळविणं कठीण गेलं. केवळ २६ मिनिटांत सानिया-डोडिग जोडीने पहिला सेट ६-२ असा गमाविला. दुसऱ्या सेटमध्ये दोघांनी आक्रमक खेळण्याचा प्रयत्न केला; मात्र स्पियर्स आणि कबाल जोडीने वर्चस्व गाजवत ६-४ असा दुसरा सेट जिंकला आणि आॅस्ट्रेलियन ओपनचं विजेतेपद पटकाविलं. सानियाने पाचव्यांदा आॅस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम फेरीत स्थान मिळविले होते. २००८ मध्ये महेश भूपतीच्या साथीने तिला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते, तर त्यानंतरच्या वर्षी या जोडीने जेतेपद पटकाविले होते. २०१४ मध्ये होरिया तेकाऊच्या साथीने सानिया उपविजेती ठरली होती. यंदाही सानियाला उपविजेतेपदावरच समाधान मानावं लागलं आहे. सानियाने तीन मिश्र ग्रँडस्लॅम जिंकले असून, ब्राझीलच्या ब्रुनो सोरेससोबत अमेरिकन ओपनचे २०१४ मध्ये मिश्र दुहेरीचे जेतेपदही पटकाविले आहे. मागच्या वर्षी सानियाला डोडिगसोबत मिश्र दुहेरीचे जेतेपद पटकाविण्याची संधी होती; पण या जोडीला फ्रेंच ओपनच्या अंतिम लढतीत लियांडर पेस-मार्टिनाहिंगीसकडून पराभवाचा धक्का बसला होता.