ऑनलाइन लोकमतडर्बी, दि. 25 - महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील पहिल्या सामन्यात भारताने इंग्लंडचा 35 धावांनी पराभव केला. या सामन्यात मिताली राजने 73 चेंडूंत 8 चौकारांसह 71 धावांची कर्णधाराला साजेशी खेळी केली. मिताली राजने सलग सात सामन्यात अर्धशतक करण्याचा पराक्रम केला आहे. मितालीने गेल्या सहा वनडे डावांत नाबाद 62, 54, नाबाद 51, नाबाद 73, 64 आणि नाबाद 70 धावा केल्या. महिला आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारी मिताली पहिली क्रिकेटपट्टू ठरली आहे. मितालीआधी एकालाही हा रेकॉर्ड करता आलेला नाहीये. मितालीने ठोकलेल्या सात अर्धशकांमध्ये चार अर्धशतके दक्षिण आफ्रिकेविरोधात तर इंग्लंड, वेस्ट इंडिज आणि बांगलादेश विरोधात प्रत्येकी एक अर्धशतकी खेळी केली आहे. महिला विश्वचषकातील सलामीच्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना पूनम राऊत (86) मिताली राज (71) आणि स्मृती मंदाना (90 ) यांच्या धमाकेधार खेळीच्या बळावर 50 षटकांत 282 धावा केल्या. इंग्लंडचा संघ ४७.३ षटकांत २४६ धावांत गारद झाला. इंग्लंडकडून फ्रॅन विल्सन हिने एकाकी झुंज देताना सर्वाधिक ७५ चेंडूंत ६ चौकारांसह ८१ आणि कर्णधार हिथर नाईट हिने ६९ चेंडूंत एक चौकार व २ षटकारांसह ४६ धावांची खेळी केली. भारताकडून दीप्ती शर्मा हिने ४७ धावांत ३ गडी बाद केले.
असा पराक्रम करणारी मिताली राज ठरली जगातील पहिली खेळाडू
By admin | Updated: June 25, 2017 06:54 IST