शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
2
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
3
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
4
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
5
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
6
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
7
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
8
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!
9
नालासोपाऱ्यात मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, तुळींज पोलिसांची प्रगतीनगर परिसरात कारवाई
10
Virat Kohli: विराट कोहलीची जर्सी खरेदी करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चाहत्यांची झुंबड, व्हिडीओ होतोय व्हायरल!
11
पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षादरम्यान या पिल्लांना सरकारने दिली झेड प्लस सुरक्षा, ७०० किमी दूर केली रवानगी
12
कॅन्सरसोबत झुंज ठरली अपयशी! ४४ वर्षीय प्रसिद्ध गायिकेचं निधन, चाहत्यांनी व्यक्त केली हळहळ
13
अरे बापरे! एका छोट्याशा चुकीमुळे होऊ शकतो प्रेशर कुकरचा भीषण स्फोट; सेफ्टीसाठी 'हे' करा
14
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
15
Astro Tips: मुलांची दहावी, बारावी झाली की पालकांनी ग्रहदशा जाणून घेत मुलांचे करिअर ठरवणे उत्तम!
16
आयकर अधिकारी सांगून छगन भुजबळ यांच्याकडे मागितली एक कोटीची खंडणी; युवक अटकेत
17
पंख्याच्या हवेवरून वरातीत पेटला वाद, लाठ्या-काठ्या, दगड धोंडे घेऊन तुंबळ हाणामारी, एकाचा मृत्यू  
18
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
19
वेळीच व्हा सावध! टूथपेस्टमुळे होऊ शकतो कॅन्सर; 'हे' केमिकल बेतेल जीवावर, आताच घ्या काळजी
20
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू

एमआयजीचे शानदार विजेतेपद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2015 03:24 IST

आकाश पारकरच्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर एमआयजी क्रिकेट क्लबने नॅशनल क्रिकेट क्लबचा ११८ धावांनी धुव्वा उडवून ६८व्या पोलीस शिल्ड क्रिकेट चषकावर नाव कोरले

मुंबई : आकाश पारकरच्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर एमआयजी क्रिकेट क्लबने नॅशनल क्रिकेट क्लबचा ११८ धावांनी धुव्वा उडवून ६८व्या पोलीस शिल्ड क्रिकेट चषकावर नाव कोरले. विजेत्यांना भारताचा भरवशाचा फलंदाज अजिंक्य रहाणेच्या हस्ते चषक देऊन गौरविण्यात आले.२४ ते २६ डिसेंबर अशा तीनदिवसीय अंतिम सामन्याच्या पहिल्या दिवशी नाणेफेक जिंकून नॅशनल क्लबने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. अडखळत्या सुरुवातीनंतर आकाश पारकरच्या शतकी खेळीच्या जोरावर एमआयजीने पहिल्या डावात ९ गड्यांच्या मोबदल्यात ३९१ धावांचा डोंगर उभारला. आकाशने १४ चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने १२७ धावा केल्या. गौरव जठारने २९ चेंडूंत ५१ धावांची खेळी करून त्याला योग्य साथ दिली. प्रत्युत्तरात नॅशनल क्लबच्या फलंदाजांनी एमआयजीच्या गोलंदाजांसमोर गुडघे टेकले. ५१व्या षटकात १९९ धावा करून संपूर्ण संघ तंबूत परतला. एमआयजीच्या आकाश आणि विनीत धुळप यांच्या भेदक माऱ्यापुढे नॅशनलची फलंदाजी ढेपाळली. आकाशने ४ बळी तर विनीतने ३ बळी घेतले. दुसऱ्या डावात एमआयजीने ४० षटकांत ७ बाद २४३ धावांवर डाव घोषित केला आणि नॅशनलला विजयासाठी ४३६ धावांचे अशक्यप्राय आव्हान दिले. नॅशनलच्या सलामी जोडीने धावफलक हलता ठेवला. सलमान अहमदने १३९ धावांची खेळी केली. पण दुसऱ्या बाजूने गडी बाद होत असल्याने त्याची खेळी व्यर्थ गेली. अखेर एमआयजीने नॅशनलला ३१७ धावांत गुंडाळले.