शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

बलाढ्य मुंबईचा यूपीला दणका

By admin | Updated: November 17, 2016 03:31 IST

प्रथम श्रेणी क्रिकेट पदार्पण करणारा आदित्य धुमाळ (५/५३) आणि सध्या फॉर्ममध्ये असलेला विशाल दाभोळकर (४/४३) यांच्या भेदक

म्हैसूर : प्रथम श्रेणी क्रिकेट पदार्पण करणारा आदित्य धुमाळ (५/५३) आणि सध्या फॉर्ममध्ये असलेला विशाल दाभोळकर (४/४३) यांच्या भेदक फिरकीच्या जोरावर गतविजेत्या मुंबईने रणजी ट्रॉफीच्या ‘अ’ गटात दणदणीत विजय मिळवताना, उत्तर प्रदेशचा १२१ धावांनी धुव्वा उडवला. मुंबईने दिलेल्या २९५ धावांचा पाठलाग करताना, उत्तर प्रदेशचा डाव १७३ धावांत संपुष्टात आला.या शानदार विजयासह ‘अ’ मुंबईने सर्वाधिक २५ गुणांसह पुन्हा एकदा अग्रस्थानी झेप घेतली आहे. मुंबईने पाच सामन्यांतून तीन विजय मिळवले आहेत. त्याच वेळी उत्तर प्रदेशचा सहा सामन्यांतून हा चौथा पराभव ठरला. त्यांच्या खात्यात केवळ चार गुण असून, गटात ते आठव्या स्थानी आहेत.मुंबईने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना उत्तर प्रदेशची फलंदाज ढेपाळले. युवा गोलंदाज धुमाळने स्वप्नवत पदार्पण करताना, उत्तर प्रदेशच्या फलंदाजांना आपल्या तालावर नाचवले. त्याने ५३ धावांत अर्धा संघ बाद करून उत्तर प्रदेशचे कंबरडे मोडले, तर दाभोळकरनेदेखील ४३ धावांत ४ बळी घेत, त्याला चांगली साथ दिली.सलामीवीर शिवम चौधरी याने १०३ चेंडूत ७ चौकारांसह ५० धावांची खेळी करून यूपीकडून एकाकी लढत दिली. समर्थ सिंगने ४२ धावांची संयमी खेळी केली. या दोघांच्या व्यतिरिक्त कोणताही फलंदाज फारकाळ खेळपट्टीवर टिकू शकला नाही. अखेरच्या दिवशी १ बाद ४३ धावांवरून सुरुवात केलेल्या यूपीचा डाव फारवेळ चालला नाही. शिवम व समर्थ या जोडीने ८१ धावांची भागीदारी करून संघाला सावरले होते. मात्र, दोघेही ठरावीक अंतराने बाद झाल्यानंतर, केवळ ४७ धावांत उर्वरित ७ बळी गेल्याने, यूपीचा डाव झटपट संपुष्टात आला. मुंबईच्या दोन्ही डावात ‘नर्व्हस नाइंटी’चा शिकार ठरलेल्या सूर्यकुमार यादवला सामनावीर म्हणून निवडले आहे. (वृत्तसंस्था)