ऑनलाइन टीम
फोर्टालेजा, दि. १८- मॅक्सिकोचा गोलकिपर गिलोर्मो ओचोआच्या भक्कम बचावामुळे मॅक्सिकोने यजमान ब्राझीलसोबतचा सामना अनिर्णित राखण्यात यश मिळवला. ओचोहने एक, दोन नव्हे तर तब्बल चार गोल अप्रतिमरित्या सेव्ह केल्याने ब्राझीलच्या खेळाडूंना मारा निष्प्रभ ठरला.
फिफा विश्वचषकाच्या अ गटात मंगळवारी मॅक्सिको आणि यजमान ब्राझील यांच्यात सामना होता. पहिल्या सामन्यात विजय मिळवणा-या ब्राझीलने मॅक्सिकोविरुद्धच्या सामन्यात अत्यंत आक्रमकपणा दाखवला. पण मॅक्सिकोचा गोलकिपर गिलोर्मो ओचोआने चपळपणा दाखवत त्यांचे प्रयत्न उधळून लावले. ब्राझीलचे फॉरवर्डवरील खेळाडू नेमार आणि ऑस्कर ओरेंड यांनी हेडर आणि किक मारुन गोल करण्याचे प्रयत्न केले. २५,४२. ८२ आणि ८८ व्या मिनीटाला ब्राझीलने केलेले प्रयत्न ओचोओने यशस्वी होऊ दिला नाही. या सामना अनिर्णित झाल्याने ब्राझील व मॅक्सिको या दोन्ही संघांच्या खात्यात चार गूण आहेत. ओचोआला त्याच्या कामगिरीसाठी सामनावीराचा पुरस्कारही देण्यात आला.