माद्रिद : बार्सिलोनाचा स्टार स्ट्रायकर लियोनाल मेस्सी याने ला लिगा फुटबॉल स्पर्धेत ३०० गोलचा टप्पा पार केला. स्पोर्टिंग गिनोज संघाला ३-१ असे हरविताना त्याने २ गोल केले. ला लिगामध्ये ३०० गोल करणारा मेस्सी हा पहिला खेळाडू बनला आहे.बार्सिलोनाने गिनोजला ३-१ असे पराभूत करून विजय मिळविला. या विजयामुळे क्लब पदकतालिकेत अव्वल स्थानावर पोहोचला आहे. क्लबचे प्रशिक्षक एन्रिक यांनी सांगितले, की मेस्सीसारखा खेळाडू आमच्या क्लबमध्ये असणे, ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. बार्सिलोनाचे आता २४ सामन्यांत ६० गुण झाले आहेत. एटलेटिको माद्रिद संघ द्वितीय स्थानावर असून, त्यांचे ५४ गुण आहेत. बार्सिलोना आणि ख्रिस्तियानो रोनाल्डोचा रियाल माद्रिद यांच्यात ७ गुणांचे अंतर आहे.सामन्याच्या २५व्या मिनिटाला मेस्सीने नोंदविलेला गोल हा त्याचा ला लिगामधील ३००वा गोल ठरला. मेस्सीचा हा ३३४वा ला लिगा सामना होता. आता त्याचे ३०१ गोल झाले आहेत. प्रशिक्षक एन्रिक म्हणाले, की त्याला आपल्या पेनल्टीमध्ये सुधारणा करावी लागेल; परंतु जोपर्यंत आमच्याकडे लुईस सुआरेज, मेस्सी आणि नेमार यासारखे खेळाडू आहेत, तोपर्यंत चिंता करण्याची गरज नाही. (वृत्तसंस्था)रियाल माद्रिदने रोमाला हरविले.रोम : ख्रिस्तियानो रोनाल्डोचा ८९व्या चॅम्पियन्स लीग गोल आणि उत्तरार्धात बदली खेळाडूने केलेल्या गोलच्या जोरावर रियाल माद्रिदने रोमाला २-० ने हरविले. रोनाल्डोने ५७व्या मिनिटाला पहिला गोल केला. निर्धारित वेळेच्या ४ मिनिटे आधी बदली खेळाडू जेसे याने गोल करून संघाला विजय मिळवून दिला.
मेस्सीचा ३००वा गोल
By admin | Updated: February 19, 2016 02:49 IST