शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
3
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
4
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
5
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
6
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
7
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
8
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
9
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
10
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
11
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
12
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
13
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
14
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
15
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
16
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
17
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
18
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
19
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
20
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...

चुरशीच्या लढतीत शाहरूखचीच सरशी

By admin | Updated: November 18, 2015 00:58 IST

बॉ लिवूड आणि प्रेक्षकांचे लक्ष आहे ते डिसेंबर महिन्यात प्रदर्शित होणाऱ्या दोन मोठ्या चित्रपटांच्या सामन्याकडे. २००७मध्ये ‘ओम शांती ओम’ विरुद्ध ‘सांवरिया’नंतर

बॉ लिवूड आणि प्रेक्षकांचे लक्ष आहे ते डिसेंबर महिन्यात प्रदर्शित होणाऱ्या दोन मोठ्या चित्रपटांच्या सामन्याकडे. २००७मध्ये ‘ओम शांती ओम’ विरुद्ध ‘सांवरिया’नंतर पुन्हा एकदा शाहरूख खान आणि संजय लीला भंसाळी यांचे चित्रपट समोरासमोरा येत आहेत. शाहरूख खानचा ‘दिलवाले’ आणि भंसाळीचा ‘बाजीराव मस्तानी’ या दोघांमध्ये दर्शक कोणत्या चित्रपटाला जास्त पसंती देणार हे तर ते सिनेमे प्रदर्शित झाल्यानंतरच समजेल. पण ही लढत चुरशीची होणार हे नक्की. मात्र अशा चुरशीच्या लढतीत अनेकदा शाहरूखच भारी पडला आहे. बॉक्स आॅफिसवर बादशाही गाजवणाऱ्या शाहरूख खानने आपल्या कारकिर्दीत अशा कित्येक स्पर्धा अनुभवल्या आहेत. विशेषत: दिवाळीच्या काळात शाहरूख खानच्या चित्रपटांना दुसऱ्या मोठ्या चित्रपटांचा सामना करावा लागला आहे. मात्र दिवाळी नेहमी शाहरूख खानला भाग्याची ठरली आहे. असाच सामना २०१२मध्ये ‘जब तक है जान’सोबत अजय देवगनच्या ‘सन आॅफ सरदार’ या चित्रपटाशी झाला होता. त्या वेळी दोन्ही चित्रपटांनी १०० कोटींच्या कमाई करणाऱ्या क्लबमध्ये जागा बनविली होती; पण चर्चा झाली ती ‘जब तक है जान’चीच. याचप्रमाणे २००४मध्ये ‘वीर-झरा’च्या बरोबरीत अब्बास मस्तानचा ‘ऐतराज’ प्रदर्शित झाला. त्या वेळीही शाहरूखनेच बाजी मारली. तसेच ‘कुछ कु छ होता है’च्या विरुद्ध डेविड धवनचा ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ हा चित्रपट आला होता. पण, ‘कुछ कुछ होता है’ हा सिनेमाच प्रेक्षकांच्या लक्षात राहिला. ‘चेन्नई एक्स्प्रेस’च्या समोर ‘वन्स अपॉन ए टाइम इन मुंबई अगेन’चे आव्हान होते. पण, अक्षय कुमार आणि इमरान खानसोबत सोनाक्षी सिन्हा यांचा हा चित्रपट चेन्नई एक्स्प्रेसच्या गतीला पार करू शकला नाही. २००६मधील ‘डॉन’ या शाहरूख खानच्या चित्रपटाचा सामना सलमान खान आणि अक्षय कुमारचा ‘जानेमन’ करू शकला नाही. २०००मध्ये आलेल्या ‘मोहब्बते’च्या सामन्यात विधू विनोद चोपडाचा ‘मिशन कश्मीर’ फिका ठरला. पुढच्या वर्षी शाहरूखचा ‘रईस’ आणि सलमानचा ‘सुलतान’ या चित्रपटांमध्ये ऐन ईदच्या धामधुमीत सामना रंगणार आहे.

-  anuj.alankar@lokmat.com