शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

मशरफी मोर्तझाने टी२० क्रिकेटतून निवृत्ती घेतली

By admin | Updated: April 5, 2017 00:19 IST

कर्णधार मशरफी मोर्तझा याने अचानकपणे टी२० क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याचे फेसबुकवर मेसेज करुन सर्वांना धक्का दिला.

कोलंबो : बांगलादेशच्या मर्यादित षटकांच्या संघाचा कर्णधार मशरफी मोर्तझा याने अचानकपणे टी२० क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याचे फेसबुकवर मेसेज करुन सर्वांना धक्का दिला. श्रीलंकाविरुध्दच्या दोन सामन्यांच्या टी२० मालिकेनंतर आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असल्याचे मोर्तझाने जाहीर केले.येथील प्रेमदासा स्टेडियममध्ये यजमान श्रीलंकेविरुध्दच्या पहिल्या सामन्याच्या पुर्वसंध्येला मोर्तझाने ही घोषणा केली. मोर्तझाने आपल्या अधिकृत फेसबुक पेजवर लिहिले की, ‘१० वर्षांहून अधिक वर्षांपर्यंत आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये बांगलादेशचे प्रतिनिधित्व करणे माझ्यासाठी अत्यंत सन्मानाची बाब ठरली. माझ्या मते सध्याचा संघ अत्यंत समतोल आहे. संघात अनेक गुणवान खेळाडू आहेत. त्यामुळे टी२० प्रकारातून निवृत्त होण्याची ही माझ्यासाठी योग्य वेळ आहे. यामुळे युवा खेळाडूंना आपली चमक दाखवण्याची संधी मिळेल.’ मोर्तझाने बांगलादेशकडून ५२ टी२० सामने खेळताना त्याने ८.०५च्या धावगतीने ३९ बळी घेतले. ४ बाद १९ धावा ही त्याची टी२० कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट कामगिरी आहे. (वृत्तसंस्था)