भारताचे पदकांचे अर्धशतक : टिंटूला रौप्य; अनू राणी व महिला हॉकीला कांस्य
इंचियोन: बॉक्सिंग क्वीन एम. सी. मेरिकोमच्या सुवर्णाची चमक, अॅथ्लीट टिंटू लुकाचे रौप्य तसेच महिला हॉकी संघ आणि भालाफेकपटू अनुराणीच्या कांस्य पदकांच्या बळावर 17 व्या आशियाडच्या 12 व्या दिवशी बुधवारी भारताने पदकाचे अर्धशतक गाठले. भारत 7 सुवर्ण, 9 रौप्य आणि 34 कांस्य पदकांसह 5क् पदके जिंकून पदक तालिकेत 11 व्या स्थानावर आला. चीन 131 सुवर्णासह 294 पदकांची कमाई करीत अव्वल स्थानावर कायम असून द. कोरिया 62 सुवर्णासह 189 पदके व जपान 39 सुवर्णासह 16क् पदके घेत दुस:या व तिस:या स्थानावर आहे.
अनुराणीला भालाफेकीत कांस्य भारताची भालाफेकपटू अनुराणी हिने बुधवारी महिलांच्या भालाफेकीत कांस्य जिंकले. 4क्क् मीटर अडथळा शर्यतीत गतविजेती अश्विनी अकुंजी मात्र चौथ्या स्थानावर फेकली गेली.
ऑलिम्पिक कांस्यविजेती असलेल्या 31 वर्षाच्या मेरी कोमने अंतिम लढतीत कझाकिस्तानची जायना शेकेरबोकोव्हा हिचा 2-क्ने पराभव केला.
महिला बॉक्सिंगचा एशियाडमध्ये चार वर्षापूर्वी समावेश झाला, तेव्हा मेरी कोमने ग्वांग्झू एशियाडमध्ये
कांस्य जिंकले होते. लुकाने 8क्क्
मीटर दौडीत सर्वश्रेष्ठ कामगिरीसह
रौप्य जिंकले. महिला हॉकी संघाने जपानवर प्ले ऑफमध्ये 2-1ने विजय साजरा केला.
मणिपूरची खेळाडू असलेली मेरी पहिल्या फेरीत प्रतिस्पर्धी खेळाडूच्या तुलनेत माघारली होती. दुस:या फेरीत तिने मुसंडी मारली. मेरीकॉमचे हे आशियाई क्रिडा स्पर्धेतील आतापर्यंतचे चौथे सुवर्णपदक आहे. तिने आतापर्यंत विश्व अजिंक्यपद स्पर्धेत पाच व एशियन इंडोअर गेम्समध्ये चार सुवर्णपदके जिंकलीत. मेरीकॉमचे हे महत्वाच्या स्पर्धामधील एकूण आकरावे सुवर्णपदक आहे.
अखेरच्या दोन फे:यांतही तिचे वर्चस्व राहिले. यादरम्यान मेरीने प्रतिस्पर्धी खेळाडूच्या चेह:यावर
।आणि शरीरावर ठोसे हाणले.
तीन फे:या एकतर्फी जिंकल्या
तसेच चौथ्या फेरीतही आक्रमकपणा कायम ठेवल्याने विजय साकार
झाला. महिला बॉक्सिंगमध्ये सरितादेवी तसेच पूजा राणी
यांच्या कांस्यापाठोपाठ हे तिसरे पदक आहे.