शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
4
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
5
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
6
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
7
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
8
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
9
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
10
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
11
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
12
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
13
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
14
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
15
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
16
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
17
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
18
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
19
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
20
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

आईस्क्रीम खाणे आणि दररोज 15 किमी धावणे, असा आहे  Mary Kom चा फिटनेस प्लॅन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2022 15:49 IST

Mary Kom : नाश्त्यामध्ये मेरी कोम वर्कआउट करण्यापूर्वी हलका स्नॅक्स घेते

नवी दिल्ली : "निरोगी शरीरात एक निरोगी मन" असे मंत्र भारताची स्टार बॉक्सिंगपटूमेरी कोम आपल्या व्यावसायिक आणि शारीरिक जीवनासाठी नेहमी उच्चारते. मेरी कोम आपल्या खेळासोबतच फिटनेससाठीही ओळखली जाते. तिला पद्मविभूषणसह अनेक पुरस्कार मिळाले आहेत. दरम्यान, मेरी कोमने अलीकडेच आपले फिटनेस रुटीन आणि डाएट प्लॅन शेअर केला आहे. निरोगी शरीर आणि मन राखण्यासाठी आपल्या दिवसाची सुरुवात कशी करते, याबाबत मेरी कोमने सांगितले आहे.

एका मीडिया मुलाखतीदरम्यान मेरी कोमने सांगितले की, ती आपल्या दिवसाची सुरुवात 15 किलोमीटर धावून करते. धावणे केवळ बॉक्सिंग सरावासाठी शरीर गरम करत नाही तर एक उत्कृष्ट कार्डिओ व्यायाम देखील देते. यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारते, स्टॅमिना वाढतो आणि शरीरातील चरबीही बर्न होते. धावण्याव्यतिरिक्त, मेरी कोम दोरी उडी, शॅडो बॉक्सिंग, वजन प्रशिक्षण आणि बॅडमिंटन सारखे काही खेळ देखील खेळते.

याचबरोबर, आपल्या डाएट प्लॅनवरही मेरी कोमने भाष्य केले. तिने सांगितले की, संतुलित आणि पौष्टिक आहार घेणे आवडते. त्यात उकडलेले तांदूळ, हिरव्या भाज्या, फळे, मांस आणि ब्रेड यांचा समावेश आहे. तसेच, व्यायामासोबतच कधी कधी संतुलन राखण्यासाठी जिलेबी किंवा आईस्क्रीम आणि काही मिठाई खाते, असेही मेरी कोमने सांगितले.

मेरी कॉम नाश्त्यात 'या' गोष्टी खातेनाश्त्यामध्ये मेरी कोम वर्कआउट करण्यापूर्वी हलका स्नॅक्स घेते. दुसऱ्या नाश्त्यात ती हिरव्या भाज्या, फळांचा रस, अंडी आणि ब्रेड खाते. तिला दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणात मांस, डाळी, भाज्या आणि रोटी आवडतात. मांस प्रोटीनची गरज पूर्ण करण्यास मदत करते आणि वजन टिकवून ठेवण्यास देखील मदत करते. पाणी आणि फळांचे रस दिवसभर हायड्रेटेड राहण्यास मदत करतात.

टॅग्स :Mary Komमेरी कोमboxingबॉक्सिंग