शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

मराठमोळ्या स्मृती मंधानाचे शतक! भारताची विंडीजवर मात

By admin | Updated: June 29, 2017 22:56 IST

भारतीय महिला संघाने महिला क्रिकेट विश्वचषकामध्ये विजयी घोडदौड कायम राखली आहे. स्मृती मंधानाने केलेल्या शानदार शतकी खेळीच्या जोरावर

 ऑनलाइन लोकमत

टॉन्टन, दि. 29 - भारतीय महिला संघाने  महिला क्रिकेट विश्वचषकामध्ये  विजयी घोडदौड कायम राखली आहे. स्मृती मंधानाने केलेल्या शानदार शतकी खेळीच्या जोरावर भारताने वेस्ट इंडिजवर सात  विकेट राखून दणदणीत विजय मिळवला.  वेस्ट इंडिजने विजयासाठी दिलेले 184 धावांचे आव्हान भारतीय संघाने 42.3 षटकांत अवघ्या तीन  विकेटच्या मोबदल्यात पार केले. 
वेस्ट इंडिजला अवघ्या 184 धावांत रोखल्यावर माफक आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरुवात चांगली झाली नाही.  गेल्या सामन्यात दणकेबाज खेळी करणारी पूनम राऊत शून्यावर आणि दीप्ती शर्मा 9 धावांवर बाद झाली. मात्र दोन विकेट झटपट माघारी परतल्यावर शतकवीर स्मृती मंधाना (नाबाद 106) आणि मिताली राऊत (46) यांनी तिसऱ्या विकेटसाठी 108 धावांची भागीदारी करत भारताचा विजय निश्चित केला. मिताली 46 धावा काढून बाद झाली. त्यानंतर स्मृती मंधाना आणि मोना मेश्राम यांनी (18) भारताच्या विजयाची औपचारिकता पार पाडली. 
तत्पूर्वी भारतीय महिला संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारल्यावर भारताच्या भेदक माऱ्यासमोर वेस्ट इंडिजचा महिला संघ फार तग धरू शकला नाही. त्यामुळे त्यांना निर्धारीत 50 षटकात 8 बाद 183 धावांपर्यंतच मजल मारता आली. भारताकडून दीप्ती शर्मा, पूनम यादव आणि हरमनप्रीत कौर यांनी प्रत्येकी दोन तर एकता बिस्ट हिने एक बळी टिपला.