शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मराठमोळ्या पूनम राऊतचं शतक, ऑस्ट्रेलियापुढे 227 धावांचे आव्हान

By admin | Updated: July 12, 2017 18:09 IST

महाराष्ट्राच्या पूनम राऊतच्या शतकाच्या बळावर भारतानं ऑस्ट्रेलियाच्या संघासमोर 227 धावांचे आव्हान ठेवलं आहे.

ऑनलाइन लोकमत
ब्रिस्टल, दि. 12 :  महाराष्ट्राच्या पूनम राऊतने ठोकलेल्या धडाकेबाज शतकाच्या बळावर भारतानं  महिला विश्वकप क्रिकेट स्पर्धेतील महत्त्वाच्या लढतीत ऑस्ट्रेलियापुढे विजयासाठी निर्धारित 50 षटकांत 227 धावांचे आव्हान ठेवलं आहे. ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारताने कर्णधार मिताली राज आणि पूनम राऊतच्या खेळीच्या बळावर 50 षटकांत सात गड्यांच्या मोबदल्यात 226 धावा केल्या. 
सलग चार सामन्यांत विजय मिळविल्यानंतर पराभव स्वीकारावा लागल्यानंतर भारतीय महिला संघ आज महिला विश्वकप क्रिकेट स्पर्धेतील महत्त्वाच्या लढतीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजयी मार्गावर परतण्यास उत्सुक आहेत . नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना महाराष्ट्राच्या पूनम राऊतनं शतक झळकावत संघाला मोठी धावसंख्या उभी करण्यात मोलाची भूमिका बजावली. मराठमोळ्या पूनम राऊतनं 136 चेंडूचा सामना करताना 106 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यानं तिनं 11 चौकार लगावले.
पूनमनं कर्णधार मिताली राजसोबत दुसऱ्या विकेटसाठी 157 धावांची विक्रमी भागिदारी केली. मितालीनं 67 धावांची खेळी करत पूनमला योग्य साथ दिली. भारताची सुरुवात आज निरशजनक झाली सलमीवीर स्मृती मानधना अवघ्या तीन धावांवर बाद झाली. अंतिम षटकात हाणामारीच्या षटकात हरमप्रीतनं भारताची धावसंख्या झटपट वाढवली. हरमप्रीत कौरनं 22 चेंडूत 23 धावांची खेळी केली. वेदा कृष्णमुर्ती आपली चमक दाखवू शकली नाही. ती शुन्य धावांवर बाद झाली. अखेरच्या षटकांत भारतानं आपल्या विकेट बहाल केल्या. 
सलग चार लढतींमध्ये विजय मिळविणाऱ्या आॅस्ट्रेलिया संघाचा विजयरथ इंग्लंडने रोखला. आॅस्ट्रेलिया संघही विजयी मार्गावर परतण्यास उत्सुक आहे. अद्याप एकही संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरलेला नाही. पण सरस नेटरनरेटच्या आधारावर आॅस्ट्रेलियाची स्थिती मजबूत आहे. आॅस्ट्रेलिया संघाला इंग्लंडविरुद्ध केवळ तीन धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता, तर भारताला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मोठ्या फरकाने पराभव स्वीकारावा लागला होता. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या लढतीत भारताला उपांत्य फेरीतील स्थान निश्चित करण्याची चांगली संधी होती. पण आता भारताला साखळी फेरीतील अखेरच्या दोन लढतींमध्ये आॅस्ट्रेलिया व न्यूझीलंड या बलाढ्य संघांच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.
 
दरम्यान, ऑस्ट्रेलियाविरूद्ध सुरू असलेल्या सामन्यामध्ये मितालीने 6 हजार धावांचा टप्पा ओलांडला. 183 एकदिवसीय सामन्यांमध्ये मितालीने हा विक्रम केला. यापुर्वी इंग्लंडची खेळाडू शार्ले एडवर्डच्या नावावर हा विक्रम होता. शार्ले एडवर्डने 191 सामन्यांमध्ये 5992 धावा बनवल्या होत्या. यासाठी शार्ले एडवर्डने  191 सामन्यांपैकी  180 डावांमध्ये फलंदाजी केली तर मितालीने त्यापेक्षा 16 डाव कमी म्हणजे केवळ 164 डावांमध्येच हा रेकॉर्ड केला. आतापर्यंत मितालीने आपल्या करिअरमध्ये 5 शतकं आणि 48 अर्धशतकं ठोकली आहेत. विशेष म्हणजे तिने शतक ठोकलं, त्या प्रत्येक वेळी भारताला विजय मिळाला आहे. तिची फलंदाजीची सरासरी 51 आहे. सलग 7 अर्धशतकं ठोकण्याचा विक्रमही मितालीच्या नावावर आहे.