शहरं
Join us  
Trending Stories
1
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
2
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
3
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
4
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
5
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
6
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
7
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
8
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
9
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
10
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
11
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
12
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
13
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
14
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
15
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
16
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
17
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
18
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
19
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
20
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं

मनू - अनमोल यांना सुवर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 03:59 IST

मनू भाकर व अनमोल या जोडीने मंगळवारी १० मीटर एअर पिस्तुल मिश्र स्पर्धेत पात्रता फेरीत विश्वविक्रमासह सुवर्णपदक पटकावले.

सिडनी : मनू भाकर व अनमोल या जोडीने मंगळवारी १० मीटर एअर पिस्तुल मिश्र स्पर्धेत पात्रता फेरीत विश्वविक्रमासह सुवर्णपदक पटकावले. भारताचे आयएसएसएफ ज्युनिअर विश्वकप नेमबाजी स्पर्धेतील हे सातवे सुवर्णपदक ठरले. गनेमत शेखों हिने महिलांच्या ज्युनिअर स्किट फायनलमध्ये ३६ गुणांसह कांस्यपदकाचा मान मिळवला.१० मीटर एअर रायफल मिश्र स्पर्धेत १७ वर्षीय श्रेया अग्रवाल व १९ वर्षीय अर्जुन बाबूताने कांस्यपदक पटकावले. त्यांनी ४३२.८ गुण मिळवले. भारताच्याच इलावेनिल वलारिवान (१८) व तेजस कृष्णा प्रसाद (२०) जोडीला या स्पर्धेत ३८९.१ गुणांसह चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले.मनू व अनमोल यांनी आपल्या गटात सुुरुवातीपासून वर्चस्व गाजवले. त्यांनी पात्रता फेरीत सर्वाधिक स्कोअर नोंदवताना ज्युनिअर क्वालिफिकेशनमध्ये विश्वविक्रम केला. अनमोल व मनू यांनी ७७० गुणांसह हा विक्रम नोंदवला.त्यानंतर अंतिम फेरीत त्यांनी पहिल्या सिरिजमध्ये कामगिरीत सातत्य राखले. ते आपले प्रतिस्पर्धी चीनचे लियू जिनयावो व ली झुई यांच्याविरुद्ध आघाडी राखून होते. अखेर त्यांनी ४७८.९ गुण नोंदवले. सध्याच्या विश्वविक्रमाच्या तुलनेत त्यांचे १.८ अंक कमी आहेत. चीनने रौप्य व कांस्य अशी दोन्ही पदके पटकावली. लियू जिनयाओ व ली झुई ४७३.३ गुणांसह दुसऱ्या तर वांग झेहाओ व झियो झियाझुआन ४१०.७ गुणांसह तिसºया स्थानी राहिले.भारताच्या दुसºया संघात १८ वर्षीय गौरव राणा व १९ वर्षीय महिमा तुर्ही अग्रवाल यांचा समावेश होता. अंतिम फेरीत त्यांना ३८ शॉटनंतर बाहेर व्हावे लागले. त्यावेळी त्यांच्या खात्यावर ३७०.२ गुणांची नोंद होती व ते चौथ्या स्थानी होते. (वृत्तसंस्था)२८मार्चला मनू २५ मीटर एअर पिस्तूल गटात सहभागी होणार असून यामध्येही तिचा सुवर्णवेध घेण्याचा प्रयत्न असेल. यानंतर ती राष्ट्रकुल स्पर्धेत सहभागी होण्यास रवाना होईल.७ सुवर्णपदकांसह भारत आता एकूण १७ पदके पटकावित दुसºया स्थानी आहे. चीन ८ सुवर्णपदकांसह एकूण २१ पदकासह अव्वल स्थानी आहे.