मुंबई : मुंबईच्या काजल कुमारी आणि पुण्याच्या अनिल मुंढे यांनी महाराष्ट्र राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत वर्चस्व राखताना अनुक्रमे महिला व पुरुष गटाचे विजेतेपद पटकावले. महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने श्री दत्तराज चॅरिटेबल नृसिंहवाडीच्या वतीने कोल्हापूर येथे झालेल्या या स्पर्धेत मुंबईकरांचे वर्चस्व दिसले. महिलांच्या अंतिम लढतीत रत्नागिरीच्या मैत्रेयी गोगटेने आपल्या लौकिकानुसार काजलला चांगलीच झुंज दिली. मात्र दुसऱ्या गेममध्ये आक्रमक खेळ करताना काजलने मैत्रेयीला २५-१९, २५-१ असे नमवून जेतेपद उंचावले. पुरुषांचा अंतिम सामना तीन गेमपर्यंत रंगला. मुंबईच्या योगेश धोंगडेने झुंजार खेळासह अनिलला कडवी टक्कर दिली. मात्र मोक्याच्या वेळी अनिलने खेळ उंचावत २५-१६, १८-२५, २५-० अशी बाजी मारली. (क्रीडा प्रतिनिधी)
मुंबईकर काजलचे दिमाखदार जेतेपद
By admin | Updated: June 27, 2016 03:12 IST