शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

मेजर ध्यानचंद ‘भारतरत्न’ सन्मानाचे मानकरी ठरणार?

By admin | Updated: August 13, 2014 01:32 IST

स्वातंत्र्यदिनी यंदा ‘भारतरत्न’ची घोषणा करण्यात येणार असल्याची चर्चा असून, भारतातील हा सर्वोच्च नागरी सन्मान हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांना मिळणार का?

नवी दिल्ली : स्वातंत्र्यदिनी यंदा ‘भारतरत्न’ची घोषणा करण्यात येणार असल्याची चर्चा असून, भारतातील हा सर्वोच्च नागरी सन्मान हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांना मिळणार का? असा प्रश्न कोट्यवधी भारतीयांना सतावत आहे. मेजर ध्यानचंद यांच्या नावाची देशातील सर्वोच्च नागरी सन्मान ‘भारतरत्न’साठी शिफारस करण्याबाबत परस्परविरोधी वृत्त कानांवर पडत असल्यामुळे, मेजर ध्यानचंद यांचे पुत्र व विश्वकप विजेत्या संघाचे सदस्य अशोक ध्यानचंद नाराज झाले आहेत. गृह राज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी मंगळवारी लोकसभेमध्ये सांगितले की, ‘ध्यानचंद यांना ‘भारतरत्न’ प्रदान करण्यासाठी अनेक विभागांतून शिफारशी प्राप्त झाल्या असून, त्या सर्व पंतप्रधान कार्यालयाला पाठविण्यात आलेल्या आहेत.’ ‘भारतरत्न’साठी शिफारशीची औपचारिकता आवश्यक नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दिवंगत मेजर ध्यानचंद यांना ‘भारतरत्न’ने गौरविण्यासाठी सरकारने राष्ट्रपतींकडे शिफारस केली असल्याचे वृत्त इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये उमटले आहे. त्यानंतर केंद्र सरकारमधील मंत्री याबाबतच्या वृत्ताचे खंडन करीत आहेत.संसदीय कार्यमंत्री एम. वेंकय्या नायडू म्हणाले, ‘भारतरत्नसाठी अद्याप एकही नाव निश्चित झालेले नाही. याबाबत जे काही चर्वितचर्वण सुरू आहे, ते केवळ मीडियाने निर्माण केलेली कथा आहे. सर्व कथा मीडियाने रचलेल्या असून अद्याप याबाबत कुठलीच चर्चा झालेली नाही.’केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी ‘भारतरत्न’बाबत सुरू असलेली चर्चा फेटाळून लावताना, अद्याप कुठलेच नाव विचाराधीन नसल्याचे सांगितले. दरम्यान, मेजर ध्यानचंद यांचे पुत्र अशोक कुमार यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली. त्यांचे दिवंगत पिता ध्यानचंद यांचे नाव वारंवार ‘भारतरत्न’साठी चर्चेत असते. जो निर्णय घ्यायचा आहे त्यावर सरकारने प्रांजळपणे मत व्यक्त करावे, असे अशोक कुमार यांनी म्हटले आहे.ध्यानचंद यांना ‘भारतरत्न’ने गौरविण्याचा निर्णय घेण्यात येणार असेल, तर सरकारने त्याची अधिकृत घोषणा करावी; अन्यथा त्यांच्या नावाची चर्चा करीत हॉकी जगतातील सर्वांत महान खेळाडूचा अपमान करू नये, असे स्पष्ट मत माजी आॅलिम्पियन्सनी व्यक्त केले आहे. (वृत्तसंस्था)