शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
2
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
3
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
4
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
5
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
6
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
7
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
8
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
9
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
10
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
11
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  
12
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
13
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले
14
चीनकडून कोण चोरतंय रेअर अर्थ मेटल? का उडालीये ड्रॅगनची झोप, काय आहे प्रकरण?
15
आरोग्याशी नको खेळ! मीठापासून साखरेपर्यंत... 'या' पांढऱ्या गोष्टी तुमच्यासाठी ठरू शकतात विष
16
"पटोलेंनी उल्लेख केलेली व्यक्ती काँग्रेसचीच"; हनी ट्रॅपची कुठलीही तक्रार नसल्याचे CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
17
"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान
18
"विधानसभेतील राडा हा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रकार’’, बाळासाहेब थोरात यांची टीका 
19
"जितेंद्र आव्हाड राजकारणातून बाहेर पडले तर मला आवडेल, कारण...", पत्नी ऋता नेमकं काय म्हणाल्या?
20
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावा लागणार; चांदीत ₹१३०० ची तेजी

महात्मा गांधी संघाचे दुहेरी विजेतेपद

By admin | Updated: May 6, 2015 02:45 IST

बलाढ्य महात्मा गांधी स्पोटर््स क्लबने ३४व्या जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत एकहाती वर्चस्व राखताना अनुक्रमे किशोरी व कुमारी गटाचे शानदार विजेतेपद पटकावून दुहेरी मुकुट पटकावले.

मुंबई : बलाढ्य महात्मा गांधी स्पोटर््स क्लबने ३४व्या जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत एकहाती वर्चस्व राखताना अनुक्रमे किशोरी व कुमारी गटाचे शानदार विजेतेपद पटकावून दुहेरी मुकुट पटकावले. त्याचवेळी किशोर गटात गोरेगावच्या सह्याद्री क्रीडा मंडळ तर कुमार गटात गोरेगावच्याच गोकुळवन क्रीडा मंडळाने बाजी मारली.मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनच्या वतीने झालेल्या या स्पर्धेत महात्मा गांधी संघाने किशोरी गटाच्या चुरशीच्या झालेल्या अंतिम सामन्यात संघर्ष क्रीडा मंडळाचा ४३-३९ असा पाडाव केला. ग्रंथाली हांडे आणि तेजस्विनी गिलबिले यांनी जबरदस्त आक्रमण करताना महात्मा गांधीच्या विजेतेपदात निर्णायक कामगिरी केली. कुमारी गटात देखील महात्मा गांधी संघाने आपला दबदबा राखला. एकतर्फी झालेल्या अंतिम सामन्यात महात्मा फुले संघ्हाचा ५७-१९ असा फडशा पाडून महात्मा गांधी संघाने दिमाखात विजेतेपद पटकावले. सायली जाधव, तृप्ती सोनावणे यांच्या जोरावर महात्मा गांधी संघाने विजेतेपद उंचावले. त्याचवेळी प्रगती कणसेने पराभूत संघाकडून एकाकी झुंज दिली. (क्रीडा प्रतिनिधी)किशोर गटामध्ये अटीतटीच्या लढतीदुसऱ्या बाजूला किशोर गटामध्ये सह्याद्री क्रीडा मंडळाने अटीतटीच्या झालेल्या अंतिम सामन्यात भरत कनगुटकर व चैतन्य नकाशेच्या चतुरस्त्र खेळाच्या जोरावर चुनाभट्टीच्या दत्तात्रय सेवा संघाचा ६०-५२ पराभव केला आणि विजेतेपदावर नाव कोरले. कुमार गटात गोकुळवन क्रीडा मंडळाने जोगेश्वरी स्फूर्ती क्रीडा मंडळाचे कडवे आव्हान ३०-१६ असे परतावून लावले आणि विजय मिळवला.