शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
2
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
3
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
4
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
5
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
6
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
7
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
8
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
9
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
10
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
11
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
12
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
13
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
14
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
15
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
16
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
17
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
18
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
19
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
20
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार

हरियाणाला मागे टाकून महाराष्ट्र अव्वल स्थानी विराजमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 03:35 IST

महाराष्ट्राच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करीत सुवर्णपदकांची कमाई करून आपल्या संघाला खेलो इंडिया राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पदकतालिकेत अव्वल स्थानी पोहोचविले.

नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करीत सुवर्णपदकांची कमाई करून आपल्या संघाला खेलो इंडिया राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पदकतालिकेत अव्वल स्थानी पोहोचविले. बुधवारी महाराष्ट्र संघ २४ सुवर्ण, २५ रौप्य व ३१ कास्यपदकांसह एकूण ८० पदके जिंकून प्रथम क्रमांकावर होते.केंद्रीय क्रीडा मंत्रालयाच्या वतीने नवी दिल्ली येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत महाराष्ट्रच्या मुला-मुलींच्या खो-खो संघाने सुवर्णपदक जिंकून दुहेरी मुकुट संपादन केला. मुलांच्या अंतिम लढतीत महाराष्ट्र संघाने केरळ संघाचा ७ मिनिटे राखून पराभव केला. पहिल्या सत्रात १०-४ गुणांनी आघाडी घेतली. नंतर केरळ संघाने ६ गुण संपादन करून बरोबरी साधली. पण शेवटी आक्रमण करणा-या महाराष्ट्राने केरळचा ७ मिनिटे राखून पराभव करत विजेतेपद जिंकले. महाराष्ट्राकडून संरक्षण करताना निहार दुबळेने (२.२५ व १.४५ से.), आदर्श मोहिते (२.२७ से.), संदेश जाधव (२.१३ से.), फैजलखान पठाण (२.०७ से.), धीरज साळुंखे (१.४९ से.) तर आक्रमणात धीरज साळुंखे व संदेश जाधवने प्रत्येकी दोन गडी बाद केले. मुलींच्या अंतिम सामन्यात प्रतीक्षा खुरंगे (३. ०३ से. व ३.०० से.), रेश्मा राठोड (३.१५ से. व ४ मिनिट), प्राची जेटनुरे (२.१० से.), रुतिका मगदूम (२ गडी बाद केले) दीक्षा सनसूरकर (३ गडी) यांच्या जोरावर महाराष्टÑाने गुजरातचा १६-१० गुणांनी पराभव करून विजेतेपद पटकावले. या संघांना प्रशांत पवार, राजू साप्ते, अजय पवार, हेमंत खेडेकर व किशोर बोंडे यांनी मार्गदर्शन केले.वेटलिफ्टिंगमध्ये ७७ किलो मुलांच्या गटात अचिंता शिऊलीने १३४ कि. स्नॅच, क्लीन अ‍ॅºड जर्कमध्ये १५८ कि. असे एकूण २९२ किलो वजन उचलून सुवर्णपदकावर कब्जा केला. प्रीतम चव्हाणने (१०० कि. स्नॅच, १३१ कि. क्लीन अ‍ॅण्ड जर्क) रौप्यपदक संपादन केले. ९४ कि. गटात तेजस लोखंडेला रौप्यपदकावर (१०३ कि. स्नॅच, १२८ कि. क्लीन अ‍ॅण्ड जर्क असे एकूण २३१ कि.) समाधान मानावे लागले. मुलींच्या ६९ किलो गटात श्रेया गणमुखीने कांस्यपदक (५८ कि. स्नॅच, ७० कि. क्लीन अ‍ॅण्ड जर्क एकूण १२८ कि.) जिंकले. (वृत्तसंस्था)>जिम्नॅस्टिक्समध्ये मुलांच्या गटात महाराष्टÑाच्या महेश गाढवेने पॉमेल हॉर्स प्रकारात ११ गुण संपादन करून सुवर्णपदकावर हक्क प्रस्थापित केला. रोमन रिंग प्रकारात किशोर फडणीसला १०.७० गुणांसह कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.मुलींच्या गटात अनईव्हन बार प्रकारात पूर्वा किरवे (८.७० गुण) आणि सिद्धी हट्टेकर (८.४० गुण) यांनी उत्कृष्ट कामगिरी करून अनुक्रमे सुवर्ण व रौप्यपदक जिंकले.व्होल्ट प्रकारात ऐश्वर्या बेलदरने ११.७०० गुण संपादन करून कांस्यपदक जिंकले. ºिहदमिक जिम्नॅस्टिक्समध्ये प्रियांका आचार्यने ३९.२५ गुण सांपदन करून कांस्यपदक आपल्या नावावर केले.

टॅग्स :Sportsक्रीडा