शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र राज्य वरिष्ठ बॅडमिंटन स्पर्धा - वैष्णवी भाले, श्रृती मुंदडा अंतिम फेरीत

By admin | Updated: July 2, 2016 20:14 IST

नागपूरच्या वैष्णवी भालेने नागपूरच्याच मृण्मयी साओजीचा पराभव करत पहिल्या महाराष्ट्र राज्य वरिष्ठ बॅडमिंटन निवड चाचणी अजिंक्यपद स्पर्धेत महिला एकेरी गटातील अंतिम फेरीत प्रवेश केला

ऑनलाइन लोकमत - 
मुंबई, दि. 02 - नागपूरच्या वैष्णवी भालेने नागपूरच्याच मृण्मयी साओजीचा पराभव करत पहिल्या महाराष्ट्र राज्य वरिष्ठ बॅडमिंटन निवड चाचणी अजिंक्यपद स्पर्धेत महिला एकेरी गटातील अंतिम फेरीत प्रवेश केला. तर दुस-या बाजूला पुण्याच्या श्रृती मुंदडाने नाशिकच्या वैदेही चौधरीचा 2-0 असा धुव्वा उडवत अंतिम फेरी गाठली. स्पर्धेत महिला एकेरी अजिंक्यपदासाठी वैष्णवी विरुद्ध मृण्मयी असा सामना शनिवारी (2 जुलै) रंगणार आहे.
 
महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनच्या मान्यतेने स्पोर्ट्स युनायटेडच्या वतीने निवड चाचणी अजिंक्यपद स्पर्धेचे सामने आयोजित करण्यात आले आहे. चेंबूर जिमखाना बॅडमिंटन कोर्टावर झालेल्या उपांत्य सामन्यात वैष्णवीला  मृण्मयीने पहिल्या सेटमध्ये कडवी झुंज दिली. मृण्मयीने सेटवर वर्चस्व राखण्याचा प्रयत्न केला. मात्र मोक्याची वेळी वैष्णवीने खेळ उंचावत 21-19 असा सेट आपल्या नावे केला. दुस:या सेटमध्ये मात्र मृण्मयीच्या खेळामध्ये काहीअंशी निराशा जाणवत होती. त्यातच वैष्णवीने आपला दमदार खेळ सुरु ठेवत सामना 21-19, 21-14 जिंकून अंतिम फेरीत शानदार प्रवेश केला.
 
दुस-या उपांत्य सामन्यात पुणोकर श्रृतीने नाशिककर वैदेहीवर 21-9, 21-9 असे सहज नमवत अंतिम फेरी गाठली. श्रृतीने पहिल्या सेट पासून सामन्यावर पकड मिळवत वैदेहीला प्रतिकार करण्याची संधीच दिली  नाही. परिणामी दोन्ही सेटमध्ये वैदेहीने निर्विवाद विजय मिळवला.
 
पुरुष एकेरीमध्ये पुण्याच्या अमेय ओकने मुंबईच्या सुशांत करमरकरवर 14-21, 21-18, 22-20 अशी मात केली. मुंबईच्या सुशांतने सामन्याला आक्रमक सुरुवात केली. पहिल्या सेटमध्ये निर्णायक आघाडी घेत सेटमध्ये 21-14 असा विजय मिळवला. मात्र दुस:याच सेटमध्ये अमेयने यशस्वी पुनरागमन करत (21-18) केले. 1-1 अशा बरोबरीनंतर अमेय-सुशांतने विजयासाठी शर्थीचे प्रयत्न केले पण अवघ्या दोन गुणांनी अमेयने बाजी मारत (22-2क्) सुशांतचे आव्हान संपुष्टात आणले. पुरुष एकेरी अजिंक्यपदासाठी अमेय आणि बृहन्मुंबईचा निगेल डिसिल्व्हा आमने-सामने येणार आहे. 
 
अन्य निकाल :
महिला दुहेरी :  
मानसी गाडगीळ-वैष्णवी अय्यर वि.वि मृण्मयी साओजी-सिमरन सिंघी 23-21, 21-17 
वैष्णवी भाले-श्रृती मुंदडा वि.वि. ऐश्वर्या नारायणमुर्ती-वरदा दिक्षीत 21-17, 21-05
 
मिश्र दुहेरी : 
निशाद द्रविड-मानसी गाडगीळ वि.वि. विपलव कुवाळे-अक्षया वारंग 21-12, 21-15 
समीर भागवत-गौरी घाटे वि.वि. गोविंद सहस्त्रबुद्धे-वैष्णवी भाले 21-13, 22-20