शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

‘महाराष्ट्र केसरी’ घोडकेची बाजी

By admin | Updated: February 2, 2016 03:37 IST

२०१२ मध्ये मीरा रोड येथे झालेल्या कुस्तीतील विजयी मल्ल महाराष्ट्र केसरी समाधान घोडके याने रविवारी येथील अभिनव विद्यामंदिर पटांगणात पार पडलेल्या कुस्त्यांच्या आखाड्यात पुन्हा बाजी मारली.

भार्इंदर : २०१२ मध्ये मीरा रोड येथे झालेल्या कुस्तीतील विजयी मल्ल महाराष्ट्र केसरी समाधान घोडके याने रविवारी येथील अभिनव विद्यामंदिर पटांगणात पार पडलेल्या कुस्त्यांच्या आखाड्यात पुन्हा बाजी मारली. आपल्या लौकिकानुसार खेळ करताना समाधानने सहज वर्चस्व राखले. तर प्रथमच महिलांसाठी खेळण्यात आलेल्या कुस्तीमध्ये भार्इंदरच्याच कोमल देसाईने विजेतेपदावर कब्जा केला.संजीवनी फाउंडेशन व मीरा-भार्इंदर कुस्तीगीर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मैदानी कुस्ती स्पर्धेतील पहिल्या क्रमांकाची कुस्ती कोल्हापूरचा महाराष्ट्र केसरी समाधान घोडके व विटाच्या बेनापूर गावातील महाराष्ट्र चॅम्पियन अप्पा बुटे यांच्यात खेळविण्यात आली. यात घोडकेने तुफान पकडी करताना अवघ्या ७ मिनिटांत अप्पावर भारंदाज डाव साधून कुस्तीचा आखाडा मारला. घोडकेने आपला हिसका दाखवताना अप्पाला प्रत्युत्तराची संधीच दिली नाही. त्याने यापूर्वी २०१२ मध्ये मीरा रोड परिसरात आयोजिलेल्या कुस्तीमध्ये इंदूरचा मध्य प्रदेश केसरी बलराम यादवला धूळ चारली होती. कमी उंचीचा फायदा घेऊन कुस्तीमध्ये सुरुवातीपासून मुसंडी मारून कमीतकमी वेळात कुस्ती निकाली काढण्याची कला त्याच्यात असल्याने प्रतिस्पर्धी कुस्तीगीराला तो पळती भुई थोडी करीत असल्याचे मीरा-भार्इंदर कुस्तीगीर संघाचे सरचिटणीस वसंत पाटील यांनी सांगितले. दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती कोल्हापूरचाच यशवंत केसरी राजू यमगर व बनारसचा यूपी केसरी राजू यादव यांच्यात बरोबरीने सोडविण्यात आली. त्याचवेळी शहरात यंदा प्रथमच महिलांची कुस्ती खेळविण्यात आली. यामध्ये मीरा-भार्इंदरमधील श्री गणेश व्यायामशाळेच्या कोमल देसाईने मुंबई पोलिसाच्या कुमोद पाटील हिच्यावर मात केली. एकूण १०० सहभागी पहिलवानांच्या ५० कुस्त्या या वेळी खेळविण्यात येऊन विजेत्या मल्लांना मान्यवरांच्या हस्ते चषक व रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी माजी खा. संजीव नाईक, फाउंडेशनचे अध्यक्ष ध्रुवकिशोर पाटील, पदाधिकारी अंकुश मालुसरे, हर्षल पाटील, ठाणे पोलीस क्रीडा विभागाच्या प्रमुख स्रेहा करनाळे, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे उपाध्यक्ष संजय शेटे व इतर मान्यवरांनी हजेरी लावली होती. (प्रतिनिधी)