शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्राला सर्वसाधारण उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 03:22 IST

महाराष्ट्राच्या खेळाडूंनी विविध क्रीडाप्रकारांत ३६ सुवर्ण, ३२ रौप्य आणि ४३ कांस्य अशी एकूण १११ पदके जिंकून केंद्रीय क्रीडा मंत्रालयाच्या वतीने आयोजित केलेल्या पहिल्या खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेत उपविजेतेपद पटकावले.

नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या खेळाडूंनी विविध क्रीडाप्रकारांत ३६ सुवर्ण, ३२ रौप्य आणि ४३ कांस्य अशी एकूण १११ पदके जिंकून केंद्रीय क्रीडा मंत्रालयाच्या वतीने आयोजित केलेल्या पहिल्या खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेत उपविजेतेपद पटकावले. बुधवारी महाराष्ट्र संघ पदकतालिकेत दुस-या क्रमांकावर होता. पण, गुरुवारी शेवटच्या दिवशी झालेल्या मुष्टियुद्ध स्पर्धांमध्ये हरियाणाच्या खेळाडूंनी बाजी मारून महाराष्ट्र संघापेक्षा ३ सुवर्णपदके जास्त संपादन (३८ सुवर्ण, २६ रौप्य व ३८ कांस्य अशी एकूण १०२ पदके) करून अव्वल स्थान मिळविले.नवी दिल्ली येथील विविध क्रीडासंकुलांमध्ये संपलेल्या या स्पर्धेत शेवटच्या दिवशी ज्यूदोमध्ये महाराष्टÑाच्या अदनन शेखने ९० किलोंवरील गटात गुजरातच्या सुत्तार शेखला इप्पोन स्कोरने (पूर्ण गुण) बाऊटची शेवटची दोन मिनिटे बाकी असताना पराभूत करून सुवर्णपदक जिंकले. मुलींच्या गटा ७० किलोंवरील गटात महाराष्टÑाच्या अपूर्वा पाटीलला हरियाणाच्या संयोगिता सिंगकडून पराभव पत्करावा लागला; त्यामुळे तिला रौप्यपदकावर समाधान मानवे लागले. आर्चरीमध्ये कंपाऊंड प्रकारात ईशा पवारने अचूक लक्ष्य साधून सुवर्णपदकावर आपला हक्क प्रस्तापित केला. रिकर्व्ह प्रकारात सुमेध मोह्ममेदने रौप्यपदक जिंकले.मुष्टियुद्धात महाराष्टÑाने एकूण ७ सुवर्ण व एक रौप्य पदक आपल्या नावावर केले.बॅडमिंटनमध्ये महाराष्ट्राच्या डावखुºया मालविका बनसोड हिने सुवर्ण पदकाला गवसणी घालताना अंतिम सामन्यात महाराष्ट्राच्याच आकर्षी कश्यप हिला २१-१२, २१-१० असा धक्का दिला. त्याचवेळी, मुलांच्या १७ वर्षांखालील गटाच्या अंतिम फेरीत मणिपूरच्या मैसनम मैरबा याने चमकदार कमगिरी करत उत्तर प्रदेशच्या आकाश यादव याचा १६-२१, २१-१४, २१-१८ असा पराभव करत सुवर्ण पटकावले.ºिहदमिक जिम्नॅस्टिक्समध्ये बॉल प्रकारात महाराष्टÑाच्या कृष्णा छेड्डाने ११.३५ गुण संपादन करून सुवर्णपदक, तर प्रियांका आचार्यने ११.३५ गुणांसह रौप्यपदक आपल्या नावावर केले. हूप प्रकारात महाराष्टÑाच्या अन्नया सोमनने १२.१०, तर श्रेया कुलकर्णीने ११.३५ गुण संपादन करून अनुक्रमे सुवर्ण व रौप्य जिंकले.>उत्कृष्ट खेळाडूंचा बहुमान :खो-खो मुले : निहार दुबळे; मुली : रेश्मा राठोडज्यूदो : स्नेहल कावरेलाला उत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार