शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

‘महामॅरेथॉन’चे महामेडल; लोकमत वृत्तपत्र समूहाचे ‘महा ब्रिलियंट’ आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 02:15 IST

‘महा ब्रिलियंट’- या शब्दातच एक आगळीवेगळी संकल्पना दडली आहे. महाराष्ट्राचे ‘नंबर वन’ दैनिक असलेल्या लोकमत वृत्तपत्र समूहाने हा आविष्कार साकारला आहे.

मुंबई : ‘महा ब्रिलियंट’- या शब्दातच एक आगळीवेगळी संकल्पना दडली आहे. महाराष्ट्राचे ‘नंबर वन’ दैनिक असलेल्या लोकमत वृत्तपत्र समूहाने हा आविष्कार साकारला आहे. ‘धावणे’ अर्थात ‘रेस’ हे ज्यांनी आयुष्य मानले आहे, त्यांच्यासाठी ही संकल्पना आहे, असे खेळाडू अनेक किलोमीटर धावतात..., दम टाकतात..., घाम गाळतात पण पुन्हा धावतात... अखेर कुठल्या ना कुठल्या मेडलवर स्वत:चे नाव कोरतात. निर्धाराच्या विजयाचे प्रतीक असलेले हे मेडल त्यांच्या कर्तृत्वाची कहाणी सांगणारे असते. त्यांच्या भावना मेडलच्या रूपाने जोपासल्या जातात.लोकमत वृत्तपत्र समूहाने राज्यातील नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर आणि नागपूर या चार प्रमुख शहरात महामॅरेथॉनचे आयोजन केले आहे. पण ही सामान्य नव्हे तर ‘महाब्रिलियंट मॅरेथॉन’ असेल. आयोजन अविस्मरणीय ठरविण्यासाठी लोकमत समूहाने फार प्रयत्न केले असून तासन्तास मंथन केले. त्यातून काही कल्पक गोष्टी पुढे आल्या.काही कल्पना निश्चितपणे स्वीकारण्यायोग्य होत्या. दीर्घकाळ चाललेल्या मंथन प्रक्रियेतून ज्या बाबींचा स्वीकार करण्यात आला, त्या शानदार अशाच आहेत.ही संकल्पना एखाद्या ‘पझल्स’सारखीच आहे. जो स्पर्धक महाराष्टÑाच्या नकाशाचे पदकजिंकेल त्याला आणखी एकविशेष पदक ‘विशेष सर्किट मेडल’ प्रदान करण्यात येणार आहे. या नावीन्यपूर्ण संकल्पनेबाबत अनेक धावपटूंसोबत चर्चा केली असता, सर्वांचे उत्तर एकच होते... ‘महा ब्रिलियंट’!पदके जोडल्यास महाराष्ट्राचा नकाशा तयार होणारज्या शहरात महामॅरेथॉनचे आयोजन होणार आहे त्या शहराचा नकाशा असलेले पदक विजेत्यांना देण्यात येईल. उदा. नाशिक महामॅराथॉन विजेत्यांना देण्यात येणाºया पदकावर नाशिक शहराचा नकाशा असेल.अन्य तिन्ही शहरांत होणाºया महामॅरेथॉन विजेत्यांना देखील त्या-त्या शहराचा नकाशा असलेले पदक प्रदान केले जाईल. जो स्पर्धक चारही शहरात आयोजित महामॅरेथॉनमध्ये सहभागी होऊन पदके पटकवेल, ती पदके जोडल्यास ‘महाराष्टÑाचा नकाशा’तयार होणार आहे.