शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
6
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
7
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
10
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
11
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
12
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
13
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
14
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
15
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
16
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
17
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
18
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
19
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
20
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

गुगलवरही चालली युरो कपची जादू

By admin | Updated: June 11, 2016 06:26 IST

फुटबॉलची जादू फक्त या खेळांच्याच चाहत्यांवरच नव्हे, तर गुगलवरदेखील चालली आहे.

पॅरिस : फुटबॉलची जादू फक्त या खेळांच्याच चाहत्यांवरच नव्हे, तर गुगलवरदेखील चालली आहे. गुगलने शुक्रवारी सुरू होणाऱ्या युरो कप २0१६ साठी विशेष डुडल बनवले आहे.गुगल नेहमीच विशेषप्रसंगी डुडल बनवते आणि युरो कपप्रती लोकांमध्ये असलेली आवड पाहता त्यावरही एक खास डुडल बनविण्यात आले आहे. त्यामुळे तेदेखील फुटबॉल चाहत्यांशी जोडले गेले आहेत. युरो कपचा उद्घाटनीय सामना यजमान फ्रान्स आणि रोमानिया यांच्यादरम्यान डी’ फ्रान्स स्टेडियममध्ये खेळवला जाईल.डुडलमध्ये हिरव्या, पिवळ्या आणि लाल रंगात गुगल लिहिण्यात आले आहे. गुगलच्या ‘एल’ला फ्रान्सची ओळख एफिल टॉवरचा आकार देण्यात आला आहे. त्याचबरोबर या विशेष डुडलमध्ये युरो कपमध्ये सहभागी होणाऱ्या सर्वच संघांच्या ध्वजांचा समावेश करण्यात आला आहे. युरो कपसाठी सुरक्षाव्यवस्था चोख ठेवण्यात आली आहे आणि त्यासाठी जवळपास ९0 हजार पोलीस कर्मचारी व सेनेच्या जवानांना तैनात करण्यात आले आहे. डी’ फ्रान्स या स्टेडियमवर गेल्या वर्षी दहशतवादी हल्ला झाला होता. त्यात जवळपास १३0 लोकांचा मृत्यू झाला होता. स्पर्धेत एकूण १0 शहरांत सामने खेळवले जातील आणि त्यात २४ संघ सहभागी होत आहेत. त्याआधी इतक्या संघांनी सहभाग घेतला नव्हता. ही स्पर्धा १0 जुलैपर्यंत रंगणार आहे. >रेल्वे कर्मचाऱ्यांच्या संपाने युरो कपवर परिणामपरिवहनमंत्री अ‍ॅलेन विडालिस यांनी शुक्रवारी युरो २0१६ फुटबॉल चॅम्पियनशिप सुरू होण्याच्या काही तास आधी संप पुकारणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यांना कामावर येण्याचे आदेश दिले जाऊ शकतात, असे सांगितले. विडालिस यांनी युरोप १ रेडियोशी सांगितले की, ‘सरकार सामन्यात चाहत्यांना आणण्यासाठी उपलब्ध साधनांचा उपयोग करील आणि जर आम्हाला रेल्वे सुरू करण्याचा आदेश आला, तर आम्ही सुरू करू.’ गेल्या १0 दिवसांपासून संपावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांशी चर्चा सुरू असण्यास त्यांनी नकार दिला. अधिकारी या मोठ्या फुटबॉल स्पर्धेसाठी कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यास कमी करणार नाहीत, असा इशाराही त्यांनी दिला. संप करण्यात कोणताही अर्थ नसल्याचेही विडालिस यांनी सांगितले.