लिस्बन : पराभव तोंडावर असताना अतिरिक्त वेळेत चमत्कारिकरीत्या धडाधड तीन गोल नोंदवत रिअल माद्रिदने एटलेटिको माद्रिदचा पराभव केला आणि चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेचे दहाव्यांदा विजेतेपद पटकावले. या जेतेपदासह त्यांनी इतिहास रचला. विशेष म्हणजे, शेवटच्या दहा मिनिटांत माद्रिद संघ ‘रिअल’ चॅम्पियन ठरला. डिएगो गोडिनने ३६व्या मिनिटाला गोल नोंदवून एटलेटिकोला आघाडी मिळवून दिली होती. ही आघाडी त्यांनी नियमित वेळेपर्यंत कायम ठेवली. इन्जुरी वेळेच्या तिसर्या मिनिटाला रिअलच्या सार्जियो रामोसने लुका मोड्रिककडून मिळालेल्या कॉर्नरवर गोल नोंदवत संघाला बरोबरीवर आणले आणि सामना अतिरिक्त वेळेत पोहचला. ला लिगा चॅम्पियन एटलेटिकोचे खेळाडू दुसर्या हाफमध्ये आघाडी वाचवण्यासाठी संघर्ष करत करत थकले. याचाच फायदा उठवत रिअलच्या खेळाडूंनी अतिरिक्त वेळेच्या अंतिम दहा मिनिटांत एकापाठोपाठ एक असे तीन गोल नोंदवले. या पराभवामुळे एटलेटिकोचे प्रथम विजेतेपदाचे स्वप्न भंगले.(वृत्तसंस्था)
माद्रिदच ‘रिअल’ चॅम्पियन!
By admin | Updated: May 26, 2014 01:17 IST