शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रकुलनंतर संघाचा आत्मविश्वास उंचावला- मधुरिका पाटकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 00:31 IST

मनिका बत्रा हिच्या नेतृत्वाखालील भारतीय संघामध्ये मधुरिकाने महत्त्वपूर्ण कामगिरी केली.

मुंबई : ‘सिंगापूरसारख्या बलाढ्य संघाविरुद्ध मिळविलेल्या शानदार विजयामुळे महिला टेबल टेनिस खेळाडूंचा आत्मविश्वास वाढला,’ असे मत नुकत्याच गोल्डकोस्ट येथे पार पडलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत सांघिक सुवर्णपदक मिळविणारी शटलर मधुरिका पाटकर हिने व्यक्त केले.मनिका बत्रा हिच्या नेतृत्वाखालील भारतीय संघामध्ये मधुरिकाने महत्त्वपूर्ण कामगिरी केली. या शानदार विजयासह आगामी १८ आॅगस्टपासून इंडोनेशिया येथे होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय संघ चमकदार कामगिरी करेल, असा विश्वासही मधुरिकाने या वेळी व्यक्त केला. मधुरिकाने वृत्तसंस्थेशी बोलताना म्हटले की, ‘आशियाई क्रीडा स्पर्धेत चीन, जपान, कोरिया, चिनी तैपई, सिंगापूर, हाँगकाँग आणि उत्तर कोरिया यांसारखे बलाढ्य संघ सहभागी होतील. राष्ट्रकुल स्पर्धेत सिंगापूरला नमविल्यानंतर आमचा आत्मविश्वास उंचावला आहे. आशियाई स्पर्धेतही आम्ही हेच सातत्य कायम राखण्याचा प्रयत्न करू.’त्याचप्रमाणे, ‘जागतिक क्रमवारीत चौथ्या आणि बाराव्या स्थानी असलेल्या खेळाडूंचा समावेश असलेल्या मजबूत संघाविरुद्ध आम्ही विजय मिळविला. यामुळे आम्ही कोणत्याही संघाविरुद्ध बाजी मारू शकतो, असा विश्वास मिळाला,’ असेही मधुरिकाने या वेळी म्हटले.सिंगापूर एक मजबूत संघ असून, अशा संघाविरुद्ध खेळणे खूप कठीण होते. त्यांच्याविरुद्ध जिंकण्यासाठी आम्हाला सर्वोत्तम खेळ करावा लागला.- मधुरिका पाटकर

 

टॅग्स :Sportsक्रीडाCommonwealth Games 2018राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०१८