साओ पावलो : स्वित्झर्लंडविरुद्धच्या लढतीत नशिबाने साथ दिल्यामुळे आपण जिंकलो आहोत. आता त्याचा पूर्ण फायदा घ्या, असा सल्ला अर्जेंटिनाचा कर्णधार लियोनेल मेस्सीने आपल्या संघ सहकार्यांना दिला. मेस्सी म्हणाला, ‘आता आम्हाला खात्री वाटते की पुढील अडथळे निश्चित पार करू. भाग्याने आम्हाला साथ दिली, त्यामुळेच आम्ही जिंकलो. स्वित्झर्लंडविरुद्धच्या लढतीत मी गोल करू शकलो नाही, त्यामुळे संपूर्ण लढतीदरम्यान मनावर दडपण होते. थोडीशी जरी चूक झाली असती, तर आम्ही विश्वचषकातून बाहेर झालो असतो. आम्हाला पेनल्टी शूटआऊट नको होते, त्यामुळेच आम्ही अतिरिक्त वेळेत जिंकण्याचा प्रयत्न करीत होतो आणि त्यात आम्हाला यश आले.’ (वृत्तसंस्था)
नशिबाने साथ दिली... त्याचा फायदा घ्या : मेस्सी
By admin | Updated: July 3, 2014 04:50 IST