शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

निष्ठा, युगा, आर्या, सिद्धीला सुवर्ण

By admin | Updated: June 16, 2015 01:55 IST

निष्ठा आगरवाल, युगा बिरनाळे, आर्या राजगुरू, सिध्दी कारखानीस यांनी आपआपल्या गटात सुवर्णपदक जिंकून राज्य जलतरण अजिंक्यपद स्पर्धेचा शेवटचा दिवस गाजविला.

पुणे : निष्ठा आगरवाल, युगा बिरनाळे, आर्या राजगुरू, सिध्दी कारखानीस यांनी आपआपल्या गटात सुवर्णपदक जिंकून राज्य जलतरण अजिंक्यपद स्पर्धेचा शेवटचा दिवस गाजविला. पुणे जिल्हा जलतरण संघटनेच्यावतीने म्हळुंगे-बालेवाडी येथिल शिवछत्रपती क्रीडा संकुलातील जलतरण तलावावर पार पडलेल्या या स्पर्धेत रविवारी पुणेच्या निष्ठा आगरवालने १२ वर्षाखालील मुलींच्या गटात १०० मी. बॅक स्ट्रोक प्रकारात १.१९.३३ सेकंदाची वेळ नोदंवून सुवर्णपदक जिंकले. या प्रकारात पुण्याच्या रिया टावरीला कास्यपदकावर समाधान मानावे लागले. १७ वर्षाखालील मुलींच्या गटात युगा बिरनाळेने २०० मी. बॅक स्ट्रोममध्ये २.३३.८७ अशी वेळ नोंदवून सुवर्णपदकावर आपला हक्क प्रस्तापित केला. याच वयोगटात ५० मी. बटरफ्लाय प्रकरात ३०.४४ वेळेची नोंद करुन आर्या राजगुरुने सुवर्णपदक आपल्या नावावर केले. युगे बिरनाळेला रौप्य तर आकांक्षा बुचडेला कास्यपदकावर समाधान मानावे लागले. १४ वर्षाखालील मुलींच्या गटात सिध्दी कारखानीसने ५० मी. बटरफ्लाय प्रकारात ३२.११ वेळ नोंदवून सुवर्णपदक जिंकले. महत्त्वाचे निकाल : १०० मी. फ्री स्टाईल मुले : इशान मोहरा (मुंबई, ५४.५६ नवीन स्पर्धा विक्रम), विराज प्रभू (ठाणे, ५५.५१), मिहिर आंब्रे (पुणे, ५७.२०), मुली : मोनिक गांधी (मुंबई, १.००), आकांक्षा बुचडे (पुणे १.०३.८७), मल्लिका बेकेरीकर (मुंंबई, १.००३.९०)२०० मी. ब्रेस्ट स्ट्रोक मुले : सिद्धार्थ संख्ये (मुंबई, २.३८.८२), मुफद्दल कापसी (मुंबई, २.५१.११), आकाश वाटकर (पुणे, २.५३.९१), मुली : आरती पाटील (मुंबई २.५१.०१ नवीन स्पर्धा उपक्रम), ज्योती पाटील (मुंबई, २.५४.२८), सागरिका जैन (ठाणे २.५६.११); ४०० मी. वैयक्तिक मिडले मुले : जेसन स्मिथ (मुंबई, ४.५६.८२), प्रज्वल वाहा (कोल्हापूर, ५.०३.६२), संदेश मालवणकर (कोल्हापूर, ५.२२.१०)