चेन्नई : आघाडीचा बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद याने रियादमध्ये विश्व ब्लिट्स चॅम्पियनशिपमध्ये फक्त एक गेम गमावणे हे मोठे यशच असल्याचे म्हटले आहे. त्याने या स्पर्धेत विश्व रॅपिड स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.आनंद विश्व ब्लिट्समध्ये मॅग्नस कार्लसन व सरगेई कारजाकीननंतर तिस-या स्थानी राहिला. त्याने सांगितले की, ‘रॅपिड व ब्लिट्समध्ये पोडियम स्थान मिळवणे शानदार असते. कारण दोन्ही वेगवेगळे प्रारूप आहेत. या स्पर्धेत फक्त एकच गेम गमावला.’ तो म्हणाला, ‘१५ मिनिट व १० सेकंदांची ही स्पर्धा असते. तो खूप संथ गेम आहे. दुसरी तीन मिनिट आणि दोन सेकंदांची असते. हा गेम पाच ते सहा मिनिटांचा असतो. याची लय खूपच वेगळी असते.’आनंदसाठी हे वर्ष खूपच कठीण राहिले. ज्यात जॉर्जियात झालेल्या विश्व बुद्धिबळ स्पर्धेत सुरुवातीच्या फेरीत तो बाहेर पडला आणि लंडन बुद्धिबळ क्लासिकमध्ये तो अंतिम स्थानावर होता. मात्र या वर्षाच्या शेवटी त्याचे अपयश यशात बदलले.आनंदने सांगितले की, ‘दोन्हींमध्ये मी अखेरच्या दिवशी अग्रस्थानावर पोहचलो. रॅपिड स्पर्धेत १४ व्या फेरीतील विजय महत्त्वाचा ठरला. त्यात अलेक्सांद्र ग्रिसचुकला पराभूत केले.’ (वृत्तसंस्था)पोडियमचे लक्ष्य कठिणआनंद म्हणाला की,‘ खूप कमी लोक आहेत त्यांना दोन्ही प्रारूपात पोडियम स्थान मिळवता आले. विश्व विजेत्या मॅग्नस कार्लसनने निश्चितपणे असे केले आहे. मात्र इतरांना हे जमले नाही. त्यावरून हे किती कठीण आहे, त्याचा अंदाज येतो.
विश्व ब्लिट्समध्ये फक्त एक डाव गमावणे हे यशच - आनंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 03:16 IST