शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
3
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
4
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
5
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
6
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
7
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
8
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
9
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
10
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
11
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
12
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख
13
Stock Market Today: १७८ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकमध्ये जोरदार तेजी, FMGC आपटले
14
नियंत्रण कक्षात आला एक फोन कॉल; अवघ्या १२ मिनिटांत पोलिस पोहचले अन् मिळालं जीवदान
15
टॅरिफवर ट्रम्प यांचा आणखी एक यु-टर्न; आता 'या'वरील आयात शुल्क कमी करण्याची घोषणा
16
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
17
Akshaya Tritiya 2025: सोन्याची किंमत पाहून फुटतोय घाम? 'हा' आहे २४ कॅरेट सोनं स्वस्तात खरेदी करायचा जुगाड
18
भरत जाधवचं 'सही रे सही' नाटक कधी निरोप घेणार? केदार शिंदे म्हणाले, "ज्या दिवशी तो..."
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
20
शाहरुख, सलमान की आमिर- कोणासोबत काम करायला जास्त आवडतं?; परेश रावल म्हणाले...

दिखेगा रैना का जलवा

By admin | Updated: November 8, 2014 03:22 IST

डावखुरा सुरेश रैना हे भारतीय संघातील अनमोल रत्न आहे, २0१५च्या वर्ल्डकपमध्ये त्याची लकाकी दिसून येईल, असे मत न्यूझीलंडचा माजी कर्णधार स्टीफन फ्लेमिंग याने व्यक्त केले.

विनय नायडू, मुंबईडावखुरा सुरेश रैना हे भारतीय संघातील अनमोल रत्न आहे, २0१५च्या वर्ल्डकपमध्ये त्याची लकाकी दिसून येईल, असे मत न्यूझीलंडचा माजी कर्णधार स्टीफन फ्लेमिंग याने व्यक्त केले. आगामी विश्वचषक आॅस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या दोन देशामध्ये संयुक्तपणे होत आहे. या पार्श्वभूमीवर न्यूझीलंडच्या पर्यटन विभागाचा ब्रँड अ‍ॅम्बेसिडर म्हणून त्याने येथील ‘लोकमत’ कार्यालयास भेट दिली. यावेळी अनेक पैलूंबाबत तो मनमोकळेपणाने बोलला...भारताचा आगामी आॅस्ट्रेलिया दौरा हा विश्वचषकातील यशाच्यादृष्टीने महत्त्वाचा असेल, असे सांगून फ्लेमिंग म्हणाला, भारतीय संघात अनेक क्वॉलिटी प्लेअर आहेत. पण डावखुरा सुरेश रैना माझ्यामते सर्वात सरस ठरतो. तो दिवसेंदिवस प्रगल्भ होत चालला आहे. उसळत्या चेंडूपुढे तो चाचपडतो. या कमजोरीवर त्याने आता मात केली आहे. त्यामुळे वर्ल्डकपमध्ये त्याचाच बोलबाला असेल. भारताचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याच्या चेन्नई सुपर किंग्ज या आयपीएल संघाचा प्रशिक्षक असलेला फ्लेमिंग म्हणतो, विश्वविजेतेपद आपल्याकडे कायम राखण्यासाठी भारताने स्मार्ट क्रिकेट खेळले पाहिजे. आॅस्ट्रेलिया दौरा त्यादृष्टीने महत्त्वाचा असेल. भारताकडे चांगल्या दर्जाचे खेळाडू आहेत. श्रीलंकेविरुध्द ते चांगली कामगिरी करीत आहेत. हीच लय त्यांना कायम राखावी लागेल. सर्व काही सुरळीत चालेल यासाठी त्यांना प्रयत्न करावे लागतील. आॅस्ट्रेलिया दौऱ्यात त्यांनी चांगली कामगिरी केली नाही तर त्याचा परिणाम त्यांच्या मिशन वर्ल्डकपवर होऊ शकतो. १४ फेब्रुवारी २0१५ ला विश्वचषक स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. पण तत्पूर्वी ४ डिसेंबर १४ ते ७ जानेवारी २0१५ या काळात भारतीय संघ तेथे कसोटी मालिका खेळेल. यापाठोपाठ भारत, आॅस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात तिरंगी मालिका खेळविली जाणार आहे. आॅस्ट्रेलियातील खेळपट्ट्या या भारतीय फिरकी गोलंदाजांसाठी आव्हानात्मक असतील असे मत व्यक्त करुन फ्लेमिंग म्हणाला, खेळपट्ट्या चांगल्या असतील तर फिरकी गोलंदाजांचा येथे कस लागेल. न्यूझीलंडमध्ये तर सीमारेषा अतिशय जवळ असते त्यामुळे तेथे गोलंदाजी करताना त्यांना अवघड होईल.