शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

विराट, डिव्हिलीयर्स यांच्या कामगिरीकडे नजरा

By admin | Updated: February 20, 2015 01:54 IST

उभय संघातील दोन स्फोटक फलंदाज विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्स यांच्यापैकी धावांचा पाऊस कोण पाडेल याकडेही चाहत्यांच्या नजरा खिळलेल्या असतील.

मेलबर्न : भारत-द. आफ्रिका यांच्यात रविवारी होणाऱ्या बहुप्रतीक्षित विश्वचषक सामन्यात काय घडेल याची चर्चा होत असताना उभय संघातील दोन स्फोटक फलंदाज विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्स यांच्यापैकी धावांचा पाऊस कोण पाडेल याकडेही चाहत्यांच्या नजरा खिळलेल्या असतील.आयसीसी वन डे क्रमवारीत डिव्हिलियर्स सध्या अव्वल स्थानावर आहे. विराटचे तिसरे स्थान असून दोघांनाही जगातील सर्वांत धोकादायक मानले जाते. दोन्ही संघांच्या यशाची भिस्तही याच दोन खेळाडूंच्या कामगिरीवर विसंबून राहील. विराटने विश्वचषकात धडाकेबाज सुरुवात करीत पाकविरुद्ध शानदार २२ वे वन डे शतक झळकविले होते. डिव्हिलियर्सने मात्र झिम्बाब्वेविरुद्ध २५ धावा केल्या. करियरमधील आकडेवारीवर नजर टाकल्यास दोघांमध्ये बरेच साम्य आहे. डिव्हिलियर्सने १८० सामन्यांत ५१.९७ च्या सरासरीने ७४८४ धावा केल्या. त्यात १९ शतके आणि ४३ अर्धशतकांचा समावेश आहे. विराटने १५१ सामन्यांत ५१.९५ च्या सरासरीने ६३३९ धावा केल्या असून, त्यात २२ शतके व ३३ अर्धशतके आहेत. भारताच्या विजयात विराटचे योगदान आणि धावांचा पाठलाग करीत विजय नोंदविण्यात त्याने घेतलेली मेहनत डिव्हिलियर्सच्या तुलनेत कैकपटींनी जास्त आहे. डिव्हिलियर्सने देखील संघाच्या विजयात वेळोवेळी सर्वस्व पणाला लावले आहे. (वृत्तसंस्था) टीम इंडियाच्या सर्वच खेळाडूंवर नजर : डोमिंगो मेलबर्न : स्टार फलंदाज विराट कोहली वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाचा मुख्य आधारस्तंभ आहे़ मात्र, असे असले तरी २२ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या लढतीत आम्ही केवळ कोहलीच नव्हे, तर भारताच्या सर्व मुख्य खेळाडूंविरुद्ध रणनीती बनविली आहे़ याच बळावर आम्ही या सामन्यात बाजी मारू, असा विश्वास दक्षिण आफ्रिकेचा प्रशिक्षक रसेल डोमिंगो यांनी व्यक्त केला आहे़डोमिंगो पुढे म्हणाले, की कोहली गत दोन वर्षांपासून भारताच्या विजयात विशेष योगदान देत आहे़ हा फलंदाज कोणत्याही परिस्थितीत उत्कृष्ट खेळ करण्यास सक्षम आहे़ मात्र, असे असले तरी आम्ही केवळ कोहलीविरुद्धच नव्हे, तर सुरेश रैना, रोहित शर्मा, महेंद्रसिंह धोनी, अजिंक्य रहाणे या खेळाडूंना लवकरात लवकर कसे बाद करता येईल याची योजना आखली आहे़ नक्कीच आमची रणनीती यशस्वी ठरेल अशी आशा आहे़