शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
2
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
3
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
4
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
5
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
6
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
7
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
8
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
9
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
10
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
11
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
12
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
13
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
14
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
15
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
16
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
17
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
18
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
19
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
20
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला

केकेआरची नजर ‘प्लेआॅफ’वर

By admin | Updated: May 7, 2017 00:40 IST

सलग दोन पराभवांमुळे निराश झालेला कोलकाता नाईट रायडर्स आयपीएल-१० मध्ये रविवारी स्पर्धेबाहेर पडलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंंगळुरुवर

बंगळुरु : सलग दोन पराभवांमुळे निराश झालेला कोलकाता नाईट रायडर्स आयपीएल-१० मध्ये रविवारी स्पर्धेबाहेर पडलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंंगळुरुवर विजय नोंदवित ‘प्लेआॅफ’मध्ये स्थान निश्चित करण्याच्या आशेने उतरणार आहे.सनरायझर्स हैदराबाद आणि रायझिंग पुणे सुपरजायंटने केकेआरवर विजय नोंदविले होते. त्यामुळे प्लेआॅफमध्ये स्थान पटकावायचे झाल्यास केकेआरला तीनपैकी दोन सामने जिंकण्याचे आव्हान आहे. दोन वेळचा चॅम्पियन केकेआरचे ११ सामन्यांत १४ गुण असून हा संघ तिसऱ्या स्थानावर आहे. पुण्याचे १६ आणि हैदराबादचे १३ गुण आहेत. उभय संघांत झालेल्या मागच्या सामन्यात केकेआरने आरसीबीवर ८२ धावांनी विजय नोंदविला होता. आरसीबी संघ  केवळ ४९ धावांत गारद झाला. गौतम गंभीरचा संघ या कामगिरीची पुनरावृत्ती करण्याच्या इराद्याने खेळणार आहे.  केकेआर सुनील नारायणकडून डावाचा प्रारंभ करण्याचा जुगार खेळत आहे. नारायणला सूर गवसला तर संघाचा विजय सोपा होतो. गौतम गंभीर, रॉबिन उथप्पा हे चांगल्या सुरुवातीचा लाभ घेण्यात यशस्वी ठरले आहेत. पण हे तिघेही अपयशी ठरले, तर मात्र युसूफ पठाणला जबाबदारीने खेळावे लागेल. मनीष पांडे उत्तम फॉर्ममध्ये असला तरी शेल्डन जॅक्सन अपेक्षेनुरुप कामगिरी करू शकलेला नाही.  अशा वेळी झारखंडचा इशांक जग्गीला संधी मिळू शकते. यंदा आरसीबीने घोर निराशा केली. हा संघ चार वेळा आॅल आऊट झाल्यामुळे १२ सामन्यांत केवळ पाच गुणांवर अडकून पडला. हा संघ आधीच बाहेर पडल्याने कर्णधार विराट कोहली आणि सहकाऱ्यांपुढे दोन्ही सामने जिंकून प्रतिष्ठा कायम राखण्याचे आव्हान असेल. त्यासाठी युवा खेळाडूंना संधी देणे योग्य ठरेल. गेल, डिव्हिलियर्स या दिग्गजांनी चाहत्यांची घोर निराशा केली. केदार जाधवच्या कामगिरीत सातत्य नव्हते, तर मनदीपसिंग आणि स्टुअर्ट बिन्नी हे अपयशीच ठरले. संघाचे  दोन फिरकीपटू सॅम्युअल बद्री आणि यजुवेंद्र चहल यांनी मात्र सर्वांचे लक्ष वेधले आहे. (वृत्तसंस्था)