लंडन : पुढील महिन्यात आॅस्ट्रेलिया-न्यूझिलंड यांच्या संयुक्त यजमानपदाखाली होणाऱ्या क्रिकेट विश्वचषकाची तयारी शिगेला पोहोचली असतानाच या खेळाची काळी बाजू मानल्या जाणाऱ्या फिक्सिंग प्रकरणाला आळा घालण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने सर्वतोपरी उपाय योजले आहेत.विश्वचषकाच्या कुठल्याही सामन्यात फिक्सिंग अथवा बेटिंग करणे आता सोपे राहणार नाही कारण सर्वस्तरावर आळा घालणारी यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. आयसीसीच्या भ्रष्टाचार विरोधी पथकाने आॅस्ट्रेलिया-न्यूझिलंडमधील स्थानिक पोलीस तसेच कायदेशीर एजन्सीच्या सहकार्याने याबाबत ठोस उपाययोजना आखली आहे.अलिकडे फिक्सिंगची सर्वाधिक कुऱ्हाड पाकिस्तान संघातील खेळाडूंवर कोसळली. गेल्या साडेचार वर्षांत पाकिस्तानचे चार खेळाडू फिक्सिंगमध्ये अडकल्याने बंदीचा सामना करीत आहेत. त्यात माजी कर्णधार सलमान बट्ट, जलद गोलंदाज मोहम्मद आमेर, मोहम्मद आसिफ आणि दानिश कनेरिया यांचा समावेश आहे.(वृत्तसंस्था)आमच्या गुप्तचर यंत्रणेकडे फिक्सिंग करणाऱ्या सर्व संशयितांची नावे आणि पत्ते आहेत. शंभरावर संशयितांची यादी तयार असून त्यांचे पत्ते आहेत. याशिवाय विश्वचषकातील सामन्यादरम्यान खराब व्यवहार करणारे आणि खेळात चालबाजी करणाऱ्या खेळाडूंवरही आयसीसीची करडी नजर असेल. - डेव्हिड रिचर्डसन, आयसीसी सीईओ
जगभरातील फिक्सर्सची यादी तयार : आयसीसी
By admin | Updated: January 22, 2015 00:22 IST