शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

चॅलेंजर्सविरुद्ध लायन्सची परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2016 03:56 IST

पहिल्या तिन्ही सामन्यांत ओळीने विजय साजरे केल्यानंतर चौथ्या सामन्यात पराभवाचे तोंड पाहणाऱ्या गुजरात लायन्सला आज रविवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुविरुद्ध विजयी पथावर परतण्याचे

राजकोट : पहिल्या तिन्ही सामन्यांत ओळीने विजय साजरे केल्यानंतर चौथ्या सामन्यात पराभवाचे तोंड पाहणाऱ्या गुजरात लायन्सला आज रविवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुविरुद्ध विजयी पथावर परतण्याचे आव्हान असेल. बंगळुरुला आक्रमक ख्रिस गेल याची उणीव जाणवणार आहे.गुजरातने किंग्ज इलेव्हन पंजाब, रायझिंग पुणे आणि मुंबई इंडियन्सचा पराभव केल्यानंतर गुजरातला सनरायझर्स हैदराबादकडून दहा गड्यांनी पराभवाचा धक्का बसला होता. आरसीबीविरुद्ध हा संघ कमकुवत गोलंदाजी व गेलच्या अनुपस्थितीचा लाभ घेत विजयासाठी प्रयत्न करणार आहे. लायन्सची फलंदाजी सलामीवीर अ‍ॅरॉन फिंच आणि ब्रँडन मॅक्युलम, सुरेश रैना, ड्वेन ब्राव्हो आणि दिनेश कार्तिक यांच्या कामगिरीवर विसंबून असेल. ब्राव्हो आणि रवींद्र जडेजा यांच्याकडूनही बऱ्याच आशा आहेत. गोलंदाजीत हा संघ डेल स्टेनऐवजी जेम्स फॉल्कनरला संधी देऊ शकतो. आरसीबीने मागच्या सामन्यात धोनीच्या पुणे संघाला नमविले होते. कोहली आणि डिव्हिलियर्स जबर फॉर्ममध्ये असल्याने त्यांच्या खेळावर निकाल अवलंबून असेल. आरसीबीची चिंता त्यांचा गोलंदाजी मारा हाच आहे. दिल्ली डेअरडेव्हिल्स आणि मुंबई इंडियन्सविरुद्ध या संघाचा मारा कुचकामी ठरला होता. (वृत्तसंस्था)प्रतिस्पर्धी संघगुजरात लायन्स सुरेश रैना (कर्णधार), सरबजित लढ्ढा, अक्षदीप नाथ, ड्वेन ब्राव्हो, पारस डोग्रा, एकलव्य द्विवेदी, जेम्स फॉल्कनर, अ‍ॅरॉन फिंच, ईशान किशन, रवींद्र जडेजा, शादाब जकाती, दिनेश कार्तिक, शिविल कौशिक, धवल कुलकर्णी, प्रवीण कुमार, ब्रँडन मॅक्युलम, प्रदीप सांगवान, जयदेव शाह, उमंग शर्मा, ड्वेन स्मिथ, डेल स्टेन, प्रवीण तांबे आणि अ‍ॅन्ड्रयू टाये. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विराट कोहली (कर्णधार), वरुण अ‍ॅरॉन, अबू नेचीम, एस. अरविंद, सॅम्युअल बद्री, स्टुअर्ट बिन्नी, यजुवेंद्र चहल, एबी डीव्हिलियर्स, प्रवीण दुबे, ख्रिस गेल, ट्रॅव्हिस हेड, इक्बाल अब्दुल्ला, केदार जाधव, अक्षय कर्णेवार, सर्फराज खान, विक्रमजित मलिक, मनदीपसिंग, अ‍ॅडम मिल्ने, हर्षल पटेल, लोकेश राहुल, परवेझ रसूल, केन रिचर्डसन, सचिन बेबी, मिशेल स्टार्क, विकास टोकस, शेन वॉटसन, डेव्हिड वीस, तबरेज शम्सी.