शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
4
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
5
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
6
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
7
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
8
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
9
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
10
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
11
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
12
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
13
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
14
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
15
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
16
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
17
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
18
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

लायन्स-सनरायजर्ससाठी ‘करा किंवा मरा’ लढत

By admin | Updated: May 13, 2017 02:03 IST

गत चॅम्पियन सनरायजर्स आणि खराब फॉर्मचा सामना करीत असलेला गुजरात लायन्स संघ आयपीएल-१० मध्ये आज शनिवारी ‘करा किंवा मरा’

कानपूर : गत चॅम्पियन सनरायजर्स आणि खराब फॉर्मचा सामना करीत असलेला गुजरात लायन्स संघ आयपीएल-१० मध्ये आज शनिवारी ‘करा किंवा मरा’ या निर्धारासह उतरणार आहेत.दिल्ली डेअरडेव्हिल्स आणि रायजिंग पुणे सुपरजायंटस्विरुद्ध पराभूत झालेल्या सनरायजर्सने मुंबईला सात गड्यांनी नमविले होते. डेव्हिड वॉर्नरच्या या संघाला आज या कामगिरीची पुनरावृत्ती करावी लागेल. १३ सामन्यात सात विजयासह सनरायजर्सचे १५ गुण असून, संघ चौथ्या स्थानावर आहे. लायन्सचे १३ सामन्यात केवळ आठ गुण असल्याने हा संघ प्ले आॅफबाहेर पडला. सनरायजर्सने सामना गमविला तर प्ले आॅफसाठी रविवारी होणाऱ्या पुणे- पंजाब यांच्यातील सामन्यावर विसंबून रहावे लागेल. पुणे संघाने पंजाबला धूळ चारली तरच हैदराबाद बाद फेरीसाठी पात्र होईल. सनरायजर्सकडे सर्वांत संतुलित संघ आहे. वॉर्नरकडे ‘आॅरेंज’ तर भुवनेश्वरकडे ‘पर्पल’ कॅप आहे. फलंदाजीत वॉर्नर आणि शिखर धवन यांच्या क्रमश: ५३५ आणि ४५० धावा आहेत. भुवनेश्वरने २३ गडी बाद केले. सिद्धार्थ कौलचे १५ आणि राशीद खानचे १४ बळी आहेत. दुसरीकडे गुजरातच्या कामगिरीत सातत्याचा अभाव आहे. कर्णधार सुरेश रैनाने आतापर्यंत ४४० धावा केल्या. मागच्या सामन्यात अ‍ॅरोन फिंच आणि दिनेश कार्तिक यांनी त्याला साथ दिली.गोलंदाजी रैनासाठी चिंतेची बाब ठरली. या संघाचे गोलंदाज बळी घेण्यात अपयशी ठरले. जखमी होऊन बाहेर पडलेला अ‍ॅन्ड्र्यू टाये याची संघाला उणीव जाणवत आहे. जेम्स फॉल्कनर तसेच रवींद्र जडेजा हे देखील पूर्णपणे फ्लॉप ठरले आहेत. (वृत्तसंस्था)