शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

‘तो’ निर्णय धोनीलाच घेऊ द्या : साहा

By admin | Updated: July 16, 2017 02:06 IST

महेंद्रसिंग धोनीने कसोटी संघातून निवृत्ती घेतल्यानंतर रिद्धिमान साहाला भारताच्या कसोटी संघात स्थान मिळाले. यानंतर साहाने आपल्या खेळाने संघ व्यवस्थापनाची

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : महेंद्रसिंग धोनीने कसोटी संघातून निवृत्ती घेतल्यानंतर रिद्धिमान साहाला भारताच्या कसोटी संघात स्थान मिळाले. यानंतर साहाने आपल्या खेळाने संघ व्यवस्थापनाची मने जिंकून स्वत:चे स्थान पक्के केले.भारताच्या आगामी श्रीलंका मालिकेसाठी साहा सध्या सराव करतोय. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत साहाने महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीविषयी भाष्य केले. तो म्हणाला, ‘धोनी कधी निवृत्त होईल, हा त्याचा प्रश्न आहे, तो निर्णय त्यालाच घेऊ द्या. प्रत्येक खेळाडूच्या कारकीर्दीत एक वाईट काळ येतोच. त्या खेळाडूची कामगिरी ढेपाळते, तरीही तो खेळाडू संघाच्या विजयात कसा हातभार लावतोय, हे पाहणे महत्त्वपूर्ण ठरते. दहापैकी दहा सामन्यात प्रत्येक वेळी तुम्हाला चांगली कामिगरी करता येईल असेही नाही. धोनीने कधी निवृत्त व्हावे, हा त्याचा प्रश्न आहे.’२०१० मध्ये आंतरराष्ट्रीय सामन्यात पदार्पण केलेल्या साहाला धोनी संघात असेपर्यंत फार सामने खेळण्याची संधी मिळाली नाही. मात्र २०१४ मध्ये धोनीने कसोटी संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर साहाची कसोटी संघात वर्णी लागली होती. साहाने कर्णधार कोहलीच्या नेतृत्वाचेदेखील कौतुक केले. २६ जुलैपासून सुरू होणाऱ्या श्रीलंका दौऱ्यात भारत तीन कसोटी, पाच वन-डे आणि एक टी-२० सामना खेळणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीपाठोपाठ वेस्ट इंडिज दौऱ्यातही महेंद्रसिंग धोनीला फारशी चमकदार कामगिरी करता आली नव्हती. त्यामुळे धोनीच्या जागेवर वन-डे संघात पर्याय शोधण्याची मागणी हळूहळू जोर धरू लागली होती. या पार्श्वभूमीवर रिद्धिमान साहाने केलेल्या वक्तव्याला महत्त्व प्राप्त झाले आहे.