शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

लिओनाल मेस्सी चषकाविना...!

By admin | Updated: June 20, 2015 00:07 IST

स्टार फुटबॉलपटू लिओनाल मेस्सी अर्जेंटिनासाठी आज शनिवारी १००वा सामना खेळणार आहे. कोपा अमेरिका स्पर्धेत जमैकाविरुद्धच्या लढतीत तो हा विक्रम नोंदवणार आहे.

चिली : स्टार फुटबॉलपटू लिओनाल मेस्सी अर्जेंटिनासाठी आज शनिवारी १००वा सामना खेळणार आहे. कोपा अमेरिका स्पर्धेत जमैकाविरुद्धच्या लढतीत तो हा विक्रम नोंदवणार आहे. एकीकडे या शतकाचे सेलिब्रेशन होत असताना मेस्सीने आपल्या देशाला एकही चषक जिंकून दिलेला नाही, याचे शल्य त्याच्या मनाला बोचत असेल. हा टप्पा गाठताना मला अतिशय आनंद झाला आहे, या स्पर्धेचा चषक उंचावून हा आनंद द्विगुणित व्हावा असा प्रयत्न असेल, अशी प्रतिक्रिया त्याने व्यक्त केली.मेस्सीने २00५ साली अंडर-२0 वर्ल्डकप आणि २00८चे आॅलिम्पिक (अंडर-२३) गोल्ड मेडल अर्जेंटिनाला जिंकून दिले आहे. आजमितीला फुटबॉल जगतातील सर्वाधिक यशस्वी खेळाडू असलेला मेस्सी वर्षाकाठी ७0 मिलियन अमेरिकन डॉलर्सची कमाई करतो. पण त्याच्या हातात वर्ल्डकप आलेला नाही की कोपा चषक नाही, त्यामुळे तो त्याच्या संघासाठी दुर्दैवी खेळाडू ठरल्याचे बोलले जाते. पण त्याने आतापर्यंत खेळलेल्या ९९ सामन्यांत अर्जेंटिनासाठी ४६ गोल केले आहेत. बार्सिलोनाकडून त्याने ४१२ सामन्यांत ४८२ गोलची नोंद केली.अर्जेंटिनाने १९९३ साली कोपा अमेरिका स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर त्यांनी मानाची एकही स्पर्धा जिंकलेली नाही. मेस्सी, सेर्जीओ अग्युएरो, कार्लोस टेवेझ आणि इतर खेळाडू देशाचा २२ वर्षांचा दुष्काळ संपवण्याच्या तयारीत आहेत. पाच वेळा हार्टब्रेक- मेस्सी २00६ साली पहिला विश्वचषक खेळला. या स्पर्धेत उपांत्यपूर्व सामन्यात त्यांना जर्मनीकडून पराभूत व्हावे लागले होते. - २00७ साली व्हेनेझुएल्ला येथे झालेल्या कोपा अमेरिका चषकाच्या अंतिम सामन्यात ब्राझीलने अर्जेंटिनाला हरवून चषक जिंकला. ही मेस्सीची पहिली कोपा अमेरिका स्पर्धा होती. - २0१0च्या विश्वचषकातही २00६ची पुनरावृत्ती झाली. जर्मनीने त्यांचे विश्वचषकातील आव्हान संपुष्टात आणले.- २0११ची कोपा अमेरिका स्पर्धा मायदेशात होेऊनही अर्जेंटिनाला विजेतेपद मिळविता आले नाही.- २0१४च्या विश्वचषकात चार गोल नोंदवून मेस्सीने अर्जेटिनाला अंतिम फेरी गाठून दिली. पण जर्मनीच्या मारिओ गोएटेझने ११३व्या मिनिटाला गोल नोंदवून मेस्सीच्या स्वप्नाचा चुराडा केला.