शहरं
Join us  
Trending Stories
1
व्वा रं पठ्ठ्या !! मगरीनं अचानक येऊन त्याचं डोकं जबड्यात धरलं, पण धाडसाने वाचवले स्वत:चे प्राण
2
विठुरायाच्या कृपेने अवचितराव पुन्हा स्वगृही! घर सोडून गेले अन् तब्बल २० वर्षांनी परतले मुळगावी...
3
पत्नीला पोटगी देण्यासाठी बेरोजगार बनला ‘चेनस्नॅचर’; नागपुरच्या पाच जबरी चोरीच्या गुन्ह्यांची उकल
4
धक्कादायक! नागपूर मध्यवर्ती कारागृहात अंडरविअरच्या इलॅस्टिकने कैद्याने घेतली फाशी
5
२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
6
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
7
खापरी–गुमगावदरम्यान ऑटोमॅटिक ब्लॉक सिग्नलिंग सिस्टम; मध्य रेल्वेकडून तंत्रज्ञानाची कास
8
कौतुकास्पद! उद्योगांच्या मदतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ शिकवणार कार्पोरेट प्रशासन
9
'महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५' मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल- नितेश राणे
10
विशेष मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन सहकार्य करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही
11
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
12
₹96 च्या IPO वर गुंतवणूकदारांच्या उड्या, 142 पट सब्सक्राइब झाला; GMP ला 43 रुपयांचा फायदा!
13
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
14
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
15
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
16
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
17
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
18
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
19
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 
20
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 

लियॉन बनला 'कर्दनकाळ', ऑस्ट्रेलियाने भारताला ढकलले बॅकफूटवर

By admin | Updated: March 4, 2017 18:19 IST

पहिल्या कसोटी सामन्याप्रमाणे दुस-या कसोटीतही ऑस्ट्रेलियाने भारताला बॅकफुटवर ढकलत पहिल्या दिवसाच्या खेळावर वर्चस्व गाजवले.

ऑनलाइन लोकमत
बंगळुरू, दि. 03 -  पहिल्या कसोटी सामन्याप्रमाणे दुस-या कसोटीतही ऑस्ट्रेलियाने भारताला बॅकफुटवर ढकलत पहिल्या दिवसाच्या खेळावर वर्चस्व गाजवले. नॅथन लियॉन भारतीय फलंदाजांचा कर्दनकाळ ठरला. त्याने 50 धावांच्या मोबदल्यात भारताच्या तब्बल आठ फलंदाजांना माघारी धाडले. लियॉनच्या फिरकीसमोर भारताचा पहिला डाव अवघ्या 189 धावात कोसळला.  
 
लोकेश राहुलचा अपवाद वगळता अन्य फलंदाजांनी नॅथन लियॉनच्या फिरकीसमोर सपशेल गुडघे टेकले. लोकेश राहुलने एकबाजू लावून धरताना (90) धावा केल्या. अन्य फलंदाज फक्त हजेरी लावण्यापुरता मैदानात आले. ऑस्ट्रेलियाच्या डावाला सुरुवात झाल्यानंतर भारतीय गोलंदाजांना अजिबात यश मिळाले नाही. बंगळुरु कसोटीच्या पहिल्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाच्या बिनबाद 40 धावा झाल्या आहेत. डेविड वॉर्नर नाबाद (23), रेनशॉ नाबाद (15) मैदानावर आहेत. 
 
 भारताच्या डावात लोकेश राहुल आणि चेतेश्वर पूजारामध्ये दुस-या विकेटसाठी झालेली 61 धावांची भागीदारी सर्वाधिक ठरली. करुण नायरने (26) धावा केल्या. भारताचे भरवशाचे फलंदाज चेतेश्वर पुजारा (१७), कर्णधार विराट कोहली (१२), अजिंक्य रहाणे (१७) लियॉनचे बळी ठरले.  पहिल्या कसोटी प्रमाणे दुस-या कसोटीतही भारतील फलंदाज फिरकीसमोर ढेपाळले. 
 
ऑस्ट्रेलियाविरोधातील पहिल्या कसोटी सामन्यातील दारुण पराभवाचा वचपा काढण्याच्या हेतूने मैदानात उतरलेल्या भारतीय संघाला १० धावांवरच पहिला धक्का बसला. जखमी मुरली विजयच्या जागी संधी मिळालेला अभिनव मुकुंद भोपळाही न फोडता बाद झाला. त्यानंतर के.एल..राहुल आणि चेतेश्वर पुजाराने भारतीच पडझड सावरत अर्धशतकाचा टप्पा गाठून दिला. मात्र ७२ धावसंख्येवर लॉयनने पुजाराला (१७) बाद केले. 
 
कर्णधार विराट कोहली फलंदाजीला आल्यावर भारतीय पाठिराख्यांच्या जीवात जीव आला. कोहलीनेही के.एल. राहुल (नाबाद ५३) सोबत डाव सावरण्याच प्रयत्न केला.  मात्र ३३ व्या षटकात लॉयनने टाकलेला एक चेंडू सोडून देण्याच्या नादात तो गेल्या मॅचप्रमाणेच पायचीत झाला. तर ४७ व्या षटकांत रहाणे १७ धावांवर आणि ५७व्या षटकात नायर २६ धावांवर बाद झाला. 
 
दरम्यान आजच्या सामन्यासाठी  भारताने दोन महत्वाचे बदल केले. जखमी मुरली विजयच्या जागी अभिनव मुकुंदला तर जयंत यादवला वगळून करुण नायरला संधी देण्यात आली आहे. मात्र के राहुलसोबत ओपनिंला उतरलेला अभिनव मुकुंद एकही धाव न करता बद झाला.
 
घरच्या मैदानावर सुरुवातीच्या सामन्यात पराभवाचा धक्का बसल्यानंतर बॅकफुटवर येण्याची वेळ भारतीय संघावर अभावानेच आली आहे. त्यामुळे चिंता आणि सावधपणा या दोन्ही बाबींचे भान राखून विजय मिळवायचा आहे. पुण्याच्या खेळपट्टीवर ओकिफीच्या फिरकीपुढे नतमस्तक झालेल्या भारतावर ३३३ धावांनी पराभूत होण्याची वेळ येताच १९ सामन्यांच्या विजयी परंपरेला खीळ बसली. या पराभवातून शहाणपणा शिकून नव्याने सुरुवात करावी लागणार आहे. अनिल कुंबळेच्या मार्गदर्शनात चेन्नईच्या खेळपट्टीवर विजय नोंदवित चार सामन्यांच्या मालिकेत बरोबरी साधण्यासाठी भारतीय खेळाडू प्रयत्नांची पराकाष्ठा करतील यात संशय नाही. त्यासाठी फिरकीपटू नाथन लियोन आणि ओकिफीसोबतच वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्क आणि जोश हेजलवूड यांचा मारा शिताफीने खेळावाच लागेल. शिवाय ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ याला लवकर गुंडाळण्याचे तंत्र शोधावे लागणार आहे. स्मिथने पुण्याच्या खेळपट्टीवर दुसºया डावात शतक झळकविले होते. पुण्यात अश्विन आणि जडेजा निष्प्रभ ठरले. त्यांना क्षेत्ररक्षकांचीही साथ लाभली नव्हती. डीआरएसचा देखील भारताला उपयोग करता आला नाही.
 
नाणेफेकीचा कौल दुसºया सामन्यात महत्त्वपूर्ण ठरणार असून लढवय्या कर्णधार अशी ओळख असलेल्या कोहलीला ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांवर तुटून पडण्याशिवाय पर्याय नाही. पहिल्या दिवशी खेळपट्टी कशी वागते यावर पुढील चार दिवसांच्या खेळाचे भाकीत अवलंबून असेल. बेंगळुरूत रविवारी पाऊस कोसळण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. याआधी द. आफ्रिकेविरुद्ध याच खेळपट्टीवर झालेल्या कसोटीत केवळ दोनच दिवसांचा खेळ शक्य झाला होता. तीन दिवस पाऊस कोसळला.
 
गेल्या काही वर्षांत भारतीय संघाने ‘बेंच स्ट्रेंग्थ’ सुधारले असल्याने दुसरी कसोटी जिंकण्यासाठी कुठले संयोजन राहील हे पाहणे रंजक ठरणार आहे. धोनीकडून नेतृत्वाचा वारसा स्वीकारणा-या कोहलीने ज्या २४ सामन्यात नेतृत्व केले त्यापैकी अनेक सामन्यात वेगवेगळे संयोजन पहायला मिळाले. या सामन्यातही एक-दोन बदल शक्य आहेत. कोहली सातत्याने पाच गोलंदाजांना खेळविण्यावर भर देत आहे. त्याचे हे डावपेच गेल्या पाच महिन्यात यशस्वी देखील ठरले.तिहेरी शतकवीर करुण नायरला अतिरिक्त फलंदाज या नात्याने संधी मिळू शकते. नायरची निवड झाल्यास जयंत यादव बाहेर बसेल. नायर खेळल्यास भारताला चार तज्ज्ञ गोलंदाजांसह उतरावे लागेल.अश्विन, जडेजा आणि उमेश यादव यांना स्वाभाविक पसंती असेल पण ईशांत किंवा भुवनेश्वर यांच्यापैकी एकाचा विचार झाल्यास भुवीला पसंती राहील. कोच अनिल कुंबळे यांनी अंतिम ११ खेळाडू सांगण्यास मात्र नकार दिला आहे. अजिंक्य रहाणेवर धावा काढण्याचा दबाव असेल.
 
दुसरीकडे आॅस्ट्रेलिया मात्र पुण्यातील विजयी संघ येथेही कायम ठेवणार आहे. प्रतिभावान फलंदाज मॅट रेनशॉ फिट आहे. खेळपट्टी फलंदाजांना अनुकूल असेल तर डेव्हिड वॉर्नरला देखील लाभ होईल. तो कोहलीसारखा नैसर्गिक आक्रमक खेळाडू आहे.