शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

लायन्सला वचपा काढण्याची संधी

By admin | Updated: May 6, 2016 05:10 IST

सलग दोन पराभवानंतर गुणतालिकेतील अव्वल स्थान गमविणाऱ्या गुजरात लायन्सला आज शुक्रवारी ‘आयपीएल-९’मध्ये सनरायझर्स हैदराबाद संघाला त्यांच्याच घरच्या

हैदराबाद : सलग दोन पराभवानंतर गुणतालिकेतील अव्वल स्थान गमविणाऱ्या गुजरात लायन्सला आज शुक्रवारी ‘आयपीएल-९’मध्ये सनरायझर्स हैदराबाद संघाला त्यांच्याच घरच्या मैदानावर नमवून पराभवाची परतफेड करण्याची संधी राहील. दुसरीकडे हैदराबादला स्टार खेळाडू युवराज सिंगची प्रतीक्षा असेल.युवराज यंदा एकही सामना खेळला नाही. टी-२० विश्वचषकादरम्यान आॅस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात तो जखमी झाला होता. गुजरातला किंग्स पंजाब आणि दिल्ली डेअरडेव्हिल्सकडून पराभवाचे तोंड पाहावे लागले होते. त्यामुळे हैदराबादविरुद्ध पुन्हा एकदा विजयासह लय पकडण्याची गुजरातला अपेक्षा असावी. हैदराबादने मागच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूला १५ धावांनी पराभूत केले होते. दोन सामने गमविल्यानंतर केकेआरपाठोपाठ लॉयन्स दुसऱ्या स्थानावर आला. हैदराबाद चार विजयांसह पाचव्या स्थानावर आहे. हैदराबादने २१ एप्रिल रोजी लायन्सला दहा गड्यांनी धूळ चारली होती. सांघिक कामगिरी करणारा संघ म्हणून हैदराबादने मुसंडी मारली हे विशेष. कर्णधार डेव्हिड वॉर्नर फॉर्ममध्ये आहे. शिखर धवन यालादेखील सूर गवसला. वॉर्नरने बेंगळुरूविरुद्ध ५० चेंडूंत ९२ धावा ठोकल्या होत्या. केन विलियम्सन यानेदेखील यशस्वी पुनरागमन करीत ३८ चेंडूंत ५० धावांचे योगदान दिले होते. मधल्या फळीत मोझेस हेन्रिक्स, नमन ओझा, दीपक हुडा यांनीही दमदार कामगिरी केली. हेन्रिक्सने मागच्या सामन्यात १४ चेंडूंत ३१ धावा केल्या. युवराज परतल्यानंतर संघाची फलंदाजी आणखीच भक्कम होणार आहे. हैदराबादकडे आशिष नेहरा, भुवनेश्वर कुमार, मुस्तफिजूर रहमान आणि हेन्रिक्स हे चांगले गोलंदाज आहेत. लायन्सचे देखील नऊपैकी सहा विजयआणि तीन पराभवांनंतर १२ गुण आहेत. (वृत्तसंस्था)उभय संघ यातून निवडणारसनरायझर्स हैदराबाद : शिखर धवन (कर्णधार), युवराजसिंग, आशिष नेहरा, डेव्हिड वॉर्नर, भुवनेश्वर कुमार, ट्रेंट बोल्ट, कर्ण शर्मा, इयान मॉर्गन, मुस्तफिजूर रहमान, आदित्य तरे, बरिंदर सरन, मोझेस हेन्रिक्स, केन विल्यमसन, नमन ओझा, अभिमन्यू मिथुन, आशिष रेड्डी, विपुल शर्मा, सिद्धार्थ कौल, रिकी भुई, बेन कटिंग, विनय शंकर व टी. सुमन.गुजरात लायन्स : सुरेश रैना (कर्णधार), धवल कुलकर्णी, रवींद्र जडेजा, ब्रँडन मॅक्युलम, जेम्स फॉल्कनर, ड्वेन ब्राव्हो, प्रवीणकुमार, दिनेश कार्तिक, ड्वेन स्मिथ, डेल स्टेन, एकलव्य द्विवेदी, ईशान किशन, पारस डोग्रा, प्रदीप सांगवान, आकाशदीप नाथ, सरबजित लड्ढा, शादाब जकाती, शिवील कौशिक, जयदेव शाह, उमंग शर्मा, अँड्र्यू टे व प्रवीण तांबे.