शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

दडपण कसे झुगारायचे हे धोनीकडून शिकलो : रायुडू

By admin | Updated: July 12, 2015 03:57 IST

कठीण परिस्थितीला सामोरे जाताना दडपण कसे झुगारायचे, हे धोनीकडून शिकल्याचे अंबाती रायुडू याने शनिवारी सांगितले. झिम्बाब्वेविरुद्ध पहिल्या

हरारे : कठीण परिस्थितीला सामोरे जाताना दडपण कसे झुगारायचे, हे धोनीकडून शिकल्याचे अंबाती रायुडू याने शनिवारी सांगितले. झिम्बाब्वेविरुद्ध पहिल्या वन डेत शतक ठोकून संघाला विजय मिळवून देण्यात काल रायुडूने मोठी भूमिका बजावली होती.तो म्हणाला, ‘‘आयपीएएलमध्ये मी गेली चार-पाच वर्षे दडपणात फलंदाजी करीत आहे. टीम इंडियाचादेखील भाग असल्याने धोनीला अशा स्थितीचा सामना करताना पाहिले आहे. धोनी परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी काय करतो, हे जवळून पाहता आले. मी जे काही शिकलो ते कृतीत आणण्याचा प्रयत्न करतो.’’कालची माझी खेळी अत्यंत विशेष होती, असे सांगून रायुडू म्हणाला, ‘‘माझ्या उत्कृष्ट खेळींपैकी ही एक खेळी होती. पाच विकेट पडल्यानंतरही शतक ठोकले. सुरुवातीला चेंडू उसळी घेत असल्याने आम्ही झिम्बाब्वेत नव्हे, तर इंग्लंडमध्ये खेळत असल्याचा भास होत होता. माझ्या शतकाच्या बळावर देशाला विजय मिळाला, ही आनंद देणारी घटना आहे. पुढच्या सामन्यात नाणेफेकीचा कौल आमच्या बाजूने येईल, अशी आशा आहे.’’ रायुडूने ३० वन डेत ४५ च्या सरासरीने पाच अर्धशतके आणि दोन शतकांसह ९११ धावा केल्या आहेत. संघाचा नियमित सदस्य नसल्याचा खेळावर प्रतिकूल परिणाम होतो का, काल असे विचारताच रायुडू म्हणाला, ‘‘मी अशा परिस्थितीनुरुप स्वत:ला सज्ज ठेवतो. मी लक्ष्य निर्धारित करीत नसल्याने दडपण जाणवत नाही. पण जेव्हा संधी मिळते तेव्हा माझा हा अखेरचा सामना आहे, असे समजून स्वत:ला सिद्ध करण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो. संधीच्या नेहमी शोधात असतो.’’(वृत्तसंस्था)