इंदूर : मध्य प्रदेशाच्या इंदूर शहरात जन्मलेल्या स्वरसम्राज्ञी व भारतरत्न लता मंगेशकर यांनी टिष्ट्वटर अकाउंटमध्ये टीम इंडियाला चमकदार कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या.प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांनी त्यांच्या जन्मगावी भारतीय कर्णधार विराट कोहलीच्या द्विशतकाचा ट्विटमध्ये उल्लेख केला आणि एक गीत शेअर केले. लतादीदींनी विराटच्या कामगिरीवर आनंद व्यक्त केला. त्यांनी ट्विट केले, की, ‘इंदूरमध्ये माझा जन्म झाला. याच शहरात विराट कोहलीने द्विशतकी खेळी केली. मी त्याचे अभिनंदन करते. धन्यवाद!’ लतादीदींनी टीम इंडिया आणि विराट कोहली यांना समर्पित करताना एक गीत शेअर केले. या गीताचे बोल आहेत, ‘कदम-कदम पर नक्श है, विजय हमारा लक्ष्य है’ लता मंगेशकर यांचा जन्म २८ सप्टेंबर १९२९ रोजी इंदूर शहरातील शीख वस्तीमध्ये झाला. (वृत्तसंस्था)
लतादीदींनी दिल्या विराटला शुभेच्छा
By admin | Updated: October 11, 2016 04:34 IST