शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

अखेरचे निर्धाव षटक, पुण्याचा विजय

By admin | Updated: May 7, 2017 05:30 IST

आयपीएल सामन्यातील अखेरचे षटक म्हटले म्हणजे त्यावर फलंदाजाची हुकुमत असणार, हे सहाजीकच मानले जाते. मात्र, पुणे सुपरजायंट्सच्या जयदेव

आकाश नेवे/आॅनलाइन लोकमतआयपीएल सामन्यातील अखेरचे षटक म्हटले म्हणजे त्यावर फलंदाजाची हुकुमत असणार, हे सहाजीकच मानले जाते. मात्र, पुणे सुपरजायंट्सच्या जयदेव उनाडकट याने आयपीएलच्या इतिहासात आज अनोखी कामगिरी नोंदवली. अखेरच्या षटकांतत्याने हॅट्ट्रिक घेत संपूर्ण षटक निर्धाव टाकले. अखेरचे षटक निर्धाव टाकण्याची अनोखी कामगिरी जयदेव उनाडकटने केली. त्यासोबतच त्याने आयपीएलमध्ये दुसऱ्यांदा पाच बळी मिळवले, तसेच स्पर्धेत १०० बळी घेण्याच्या विक्रमालाही गवसणी घातली.सनरायजर्स हैदराबाद विरोधातील या सामन्यात पुण्याच्या संघाने १४८ धावा केल्या, हे लक्ष्य हैदराबादच्या धुरंधरांसाठी तसे फारसे कठीण नव्हते. मात्र, स्टोक्सने धवन, वॉर्नर आणि केन विल्यम्सला बाद करत हैदराबादला धक्के दिले. ताहीरने हेन्रीक्सला बाद केले, त्यानंतर खेळपट्टीवर सुरू झाला तो जयदेव उनाडकटचा खास शो! जयदेवने ४७ धावा करणाऱ्या युवराजला बाद करत हैदराबादच्या आशांना सुरूंग लावला. यष्टीरक्षक नमन ओझाही त्याचाच बळी ठरला. अखेरच्या षटकांत हैदराबादला विजयासाठी १३ धावांची आवश्यकता होती, हे लक्ष्य आयपीएलमध्ये तसे सोपे मानले जाते. या षटकातल्या पहिल्याच चेंडूूवर धाव घेणे विपुल शर्माला जमले नाही. दुसऱ्या चेंडूवर अगतिक झालेल्या विपुलने फटका मारण्याचा प्रयत्न केला आणि स्टोक्सने सहज घेतला. तिसऱ्या चेंडूवर युवा रशीद खाननेही पुन्हा तीच चूक केली. या वेळी उनाडकटने स्वत:च झेल घेत त्याला तंबूत पाठवले. चौथ्या चेंडूवर भुवनेश्वर कुमारलाबाद करत आपली हॅट्ट्रिक आणि संघाचा विजय साकारला. अखेरचे दोन चेंडूही निर्धाव टाकत उनाडकटने डेथ ओव्हरमधले षटक निर्धाव टाकण्याची कामगिरी केली.या सामन्यात पाच बळी घेतल्यानंतर आॅरेंज कॅपच्या शर्यतीत उनाडकटने तिसरे स्थान गाठले असून त्याने १२ सामन्यांत १७ गडी बाद केले. त्याच्या पुढे इम्रान ताहीर (१८ बळी) आणि भुवनेश्वर कुमार (२१ बळी) हे आहेत. या विजयाने गुणतक्त्यात पुणे सुपरजायंट्सने दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. पुण्याने १२ सामन्यांत ८ विजयांसह १६ गुणांची कमाई केली आहे. उर्वरित दोन सामन्यांपैकी एक विजयही पुण्याला प्लेआॅफपर्यंत सहजपणे पोहोचवू शकतो. पुण्याला पुढचे दोन सामने प्ले आॅफसाठी झगडणाऱ्या दिल्ली डेअरडेव्हिल्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब विरोधात खेळायचे आहेत.