शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
2
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
3
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
4
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
5
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
6
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
7
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
8
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
9
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
10
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
11
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
12
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
13
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
14
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
15
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
16
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
17
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
18
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
19
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
20
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल

लंकेने भारताला लोळविले

By admin | Updated: February 10, 2016 03:50 IST

आॅस्ट्रेलिया विजय मिळवून आलेल्या भारतीय संघाला पहिल्याच टी-टष्ट्वेन्टी सामन्यात श्रीलंकेने धूळ चारत तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. गोलंदाजी व फलंदाजीत

- विशाल शिर्के,  पुणेआॅस्ट्रेलिया विजय मिळवून आलेल्या भारतीय संघाला पहिल्याच टी-टष्ट्वेन्टी सामन्यात श्रीलंकेने धूळ चारत तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. गोलंदाजी व फलंदाजीत सरस कामगिरी करीत भारतावर ५ गडी राखून विजय मिळविला. दसून शनाका व सामनावीर कसून रजिथा विजयाचे शिल्पकार ठरले. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या गहुंजे येथील आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावर हा सामना झाला. श्रीलंकेने नाणेफेक जिंकून गोलंदाजी स्वीकारली. गोलंदाजांनी हा निर्णय सार्थ ठरवित भारताला १०१ धावांत गुंडाळले. विजयासाठीचे हे माफक आव्हान लंकेने १८ षटकांत ५ बाद १०५ धावा करीत पार केले. निरोशन डिकवेला (४), दनुश्का गुणतिलके (९) या सलामीच्या जोडीला आशिष नेहराने झटपट बाद करीत श्रीलंकेला झटका दिला. त्यानंतर कर्णधार चंडीमल व चामरा कापूदेगरा या जोडीने तिसऱ्या बळीसाठी ३९ धावांची भागीदारी केली. चंडीमलने ३५ चेंडूत १ चौकार व २ षटकाराच्या सहाय्याने ३५ धावा फटकावल्या. तर कापूदेगराने २६ चेंडूत ४ चौकाराच्या सहाय्याने २५ धावा टोलावल्या. आश्विनने कापूदेगराला बाद करीत श्रीलंकेला तिसरा झटका दिला. त्यावेळी श्रीलंकेच्या ११.३ षटकांत ३ बाद ६२ धावा झाल्या होत्या. त्यानंतर चंडीमल व शनाका (३) पाठोपाठ बाद झाल्याने श्रीलंकेची अवस्था ४ बाद ८४ वरुन ५ बाद ९४ अशी झाली. मात्र तोपर्यंत विजयाची केवळ औपचारिकता शिल्लक होती. मिलिंदा श्रीवर्धने याने १४ चेंडूत २ चौकार व १ षटकाराच्या सहाय्याने २१ धावा फटकावित संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. सेकुगे प्रसन्ना ३ धावांवर नाबाद राहिला. चंडीमलला रैनाने तर कापूदेगराला आश्विनने पायचीत केले. तत्पूर्वी कसुन रजिथा याने कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवित सलामीची जोडी तंबुत धाडली. सामन्याच्या दुसऱ्याच चेंडूवर सलामीवीर रोहित शर्माने टोलावलेला चेंडू दुशमंथा चमीरा याने हवेत सूर घेत टिपला. पाठोपाठ अजिंक्य रहाणे (४ चेंडूत ४ धावा) याने मारलेल्या फटक्यावर उसळी मारलेला चेंडू कर्णधार दिनेश चंडीमल याने पुढे सरसावत सुरेख झेल घेत दुसरा झटका दिला. पहिल्या षटकांत २ बाद ५ अशी अवस्था झाली. नंतर शिखर धवन (१३ चेंडूत ९ धावा), सुरेश रैना (२० चेंडूत २०) व पाठोपाठ कर्णधार महेंद्रसिंह धोनी (२) बाद झाल्याने भारताची अवस्था ५ बाद ५१ झाली. पुढच्याच षटकात युवराज (१४ चेंडूत १०) चामिराच्या चेंडूवर एका खराब फटक्यावर त्याच्याकडेच झेल देऊन परतला. पाठोपाठच्या हार्दिक पंड्या (२) नंतर रवींद्र जडेजा (९ चेंडूत ६) बाद झाला. त्यामुळे शंभरीच्या आत भारताचे पानिपत होईल असे वाटत होते. मात्र आर. आश्विनने नाईटवॉचमनची भूमिका बजावत नेहराच्या साथीत संघाला शंभरी पार करून दिली. आश्विनने ५ चौकाराच्या सहाय्याने २४ चेंडूत ३१ धावांची खेळी करीत संघाला शंभरी पार नेले. आकडे बोलतात..टी-२० क्रिकेटमध्ये श्रीलंकेने चौथ्यांदा भारतीय संघाला हरविले. भारत-श्रीलंका यांच्यातील हा सातवा टी-२० सामना होता.१०१ ही भारताची श्रीलंकेविरुद्धची टी-२०तील निचांकी धावसंख्या ठरली आहे. यापूर्वी २०१४मध्ये ढाक्यात श्रीलंकेने भारतीय संघाला ४ बाद १३० धावांवर रोखले होते. टी-टष्ट्वेन्टीत भारताची १०१ ही तिसरया क्रमांकाची निचांकी धावसंख्या ठरली आहे. मेलबर्नला २००८मध्ये आॅस्ट्रेलियाने भारतीय संघाला ७४ धावांत गुंडाळले होते, तर कटकला २०१५मध्ये दक्षिण आफ्रिकेने ९२ धावांत रोखले होते.धावफलक : भारत : रोहित शर्मा झे. चामिरा गो. रजिथा ०, शिखर धवन झे. गुनातिलाका गो. रजिथा ४, अजिंक्य रहाणे झे. चंदिमल गो. रजिथा ४, सुरेश रैना त्रि. गो. शनाका २०, युवराज सिंग झे. गो. चामिरा १०, महेंद्रसिंह धोनी झे. डिकवेला गो. शनाका २, हार्दिक पांड्या पायचीत गो. शनाका २, रवींद्र जडेजा पायचित गो. सेनानायके ६, आर. आश्विन नाबाद ३१, आशिष नेहरा झे. श्रीवर्धना गो. चामिरा ६, जसप्रित बुमराह धावबाद रजिथा/चंदिमल ०; अवांतर : ११; एकूण : १८.५ षटकांत सर्व बाद १०१, गडी बाद होण्याचा क्रम : १/०, २/५, ३/३२, ४/४९, ५/५१, ६/५३, ७/५८, ८/७२,९/१००,१०/१०१; गोलंदाजी : कासुन रजिथा ४-०-२९-३, थिसारा परेरा ३-१-१०-०, सचित्रा सेनानायके ३-०-१८-१, दुशमंथा चामिरा ३.५-०-१४-२, दसुन शनाका ३-०-१६-३, सेकुगे प्रसन्ना २-०-११-०.श्रीलंका : निरोशन डिकवेल झे. धवन गो. नेहरा ४, धनुषा गुनातिलाका झे. धवन गो. नेहरा ९, दिनेश चंदिमल पायचित गो. रैना ३५, चामरा कापूदेगरा पायचित गो. आश्विन २५, मिलिंदा सिरीवर्धना नाबाद २१, दसुन शनाका झे. रैना गो. आश्विन ३, सेकुगे प्रसन्ना नाबाद ३; अवांतर : ५; एकूण : १८ षटकांत ५ बाद १०५; गडी बाद होण्याचा क्रम १/४, २/२३, ३/६२, ४/८४, ५/९१, गोलंदाजी आशिष नेहरा ३-०-२१-२, जसप्रित बुमराह ४-१-१९-०, रवींद्र जडेजा ३-०-१८-०, हार्दिक पांड्या ३-०-१८-०, आर. आश्विन ३-०-१३-२, सुरेश रैना २-०-१३-१.